
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- प्रदिप मडावी
उपरवाही
आज दिनांक 05/08/2022 रोजी नांदगाव येथे अंबुजा सिमेंट फाउंडेशन उप्परवाही , ग्रामपंचायत नांदगाव आणि जिल्हा परिषद नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्वतंत्रच्या अमृतमहोत्सवी वर्षी निमित्त जिल्हा परिषद शाळेत विविध संस्कृतीक स्पर्धा आणि वृक्षरोपन चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला . या कार्यक्रमाला नांदगाव ग्रामपंचायत चे सरपंच विजयभाऊ निखाडे , ग्रामसेवक रामदास राठोड, ग्रामपंचायत सदस्य प्रविण टिपले , श्यामभाऊ कोलांडे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रफुल्ल कातकर, अंगणवाडी सेविका गीताताई कवठे, लांजेकर , कोराडी येथील माजी अंगणवाडी सेविका पार्वता कोलांडे , पी एच सी सबसेंटर नांदगाव येथील कर्मचारी तसेच अंबुजा सिमेंट फाउंडेशन चे उत्तम कापूस प्रकल्प चे कार्यकर्ते संजय गुर्जलवार व सुचिता खडसे तर आरोग्य विभाग मधुन कविता ताई पडाल ,प्रतिभा ताई घोटकर उपस्थित होते. शेतकऱ्यांना खत व्यवस्थापन , पीक संरक्षण , फवारणी , फवारणी करतांना घ्यावयाची काळजी, आरोग्य, शिक्षण, बूस्टर डोस , पर्यावरण , स्वच्छता, इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. संस्कृतीक कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले व वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.