
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
——–०——
परभणी : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त परभणी शहरातील सर्व शासकीय कार्यालये विद्युत रोषणाईने आकर्षक बनली आहेत. डोळ्याचं पारणं फिटावं अशी ही रोषणाई समस्त नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालयासह शहरांतील अधिकांश शासकीय, निमशासकीय तथा अनेक खासगी कार्यालयांवर भारतीय तिरंग्याच्या रुपाने झगमगून दिसत आहे.
जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली आतापर्यंत झालेल्या सर्व उपक्रमांमधून “हर घर तिरंगा” या संबंधीचे भरीव मार्गदर्शन जागोजागी करण्यात आले. घरे, कार्यालये, इमारती यांच्यासह जेथे जेथे शक्य आहे, तेथे तेथे भारतीय तिरंगा डौलाने फडकवला पाहिजे असे सक्त निर्देश दिले आहेत. शहरातील सर्व रस्त्यांवरील खांबांवर तीन रंगांत विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. चौका-चौकांमधून आकर्षक सजावट, रस्त्यांच्या दोन्ही बाजूने तिरंगी कपड्याची मांडणी व सजावट, त्यावर जागोजागी तिरंगा झेंडे लावून शहरातील रस्ते, गल्ल्या, लहान लहान रस्ते सजवली आहेत.
संपूर्ण देशभरात उत्साहपूर्ण साजरा केले जाणारा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी उपक्रम प्रभावीपणे राबविला जात आहे. किंबहुना महाराष्ट्र राज्याबरोबरच परभणी जिल्ह्यातही हा उपक्रम अत्यंत जोशातव उल्हासात राबवण्यासाठीच्या विधायक सूचनांचे व कठोर आदेशांचे पालन योग्य रितीने झाले पाहिजे असे सांगून जे उल्लंघन करतील त्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला जाईल असेही जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी ठणकावून सांगितले आहे.
राष्ट्राभिमान व राष्ट्रप्रेम जागृती साठी हा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन संपूर्ण जिल्हा व शहरांतील प्रत्येक नागरिकाने उत्साहपूर्ण साजरा केला पाहिजे अशी देशाभिमानाची भावना श्रीमती गोयल यांच्या प्रती असल्याचे दिसून येत आहे. शहरात सर्वत्र करण्यात आलेली आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई खरोखरच डोळ्याचं पारणं फेडणारी व मनावर अधिराज्य गाजवणारी असल्याचे दिसून येत आहे.