
दैनिक चालु वार्ता लोहा ग्रा. प्रतिनिधी- राम कराळे . .
ग्रामपंचायत अंतेश्वर येथे आजादी का महोत्सव या अनुषंगाने गावातील नागरिकांना घरघर तिरंगा लावण्यासाठी ध्वज वाटप करण्यात आले यावेळी तुकाराम पाटील कराळे यांनी संपूर्ण गावकरी मंडळींना आव्हान केले की आज आपल्या भारत देशाला स्वतंत्र मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि आपला भारत देश 75 व्या वर्षी अमृत महोत्सव साजरा करत आहे तरीआपन सर्वांनी आपल्या घरावर तिरंगा लावावा व या तिरंग्याचा कुठलाही अपमान होणार नाही ही काळजी घेतली पाहिजे असेही सांगण्यात आले यावेळी उपस्थित गावातील नागरिक शालेय शिक्षण समिती अध्यक्ष शंकर नवनाथ कराळे व मंगेश कराळे संभाजी पाटील कराळे बाळु कराळे गोविंद कराळे बालाजी मोरे दासु कराळे राम कराळे आनेक गावकरी उपस्थित होते.