
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी -मोहन आखाडे
औरंगाबाद – स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सवांतर्गत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात व औरंगाबाद महापालिकेच्या माझे शहर स्वच्छ शहर आणि उज्जीवन बँकेच्या स्वच्छ नेबरहुड या उपक्रमात उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक गारखेडा शाखेने सक्रिय सहभाग नोंदवला. औरंगाबाद शहर स्वच्छ व सुंदर होत असतानाच दुसरीकडे रस्त्यांवर अथवा परीसरात, मंदिरासमोर उघड्यावर कचरा टाकला जात आहे. या पार्श्वभूमीवर मनपा, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या गारखेडा शाखेने गारखेडा परिसर येथील मुख्य चौरस्ता परिसर , गजानन महाराज मंदिर परिसरातील कचरा हटवून व रॅली द्वारे स्वच्छतेचा संदेश देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
शहरात ठिकठिकाणी साचलेला उघड्यावरील कचरा महापालिका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून साफ- सफाई करण्यात येत आहे. शहरातील विविध भागात कचरा उघड्यावर कचरा टाकू नये, नागरिकांनी त्यामध्ये ओला- सुका कचरा वेगळा करावा. असा संदेश या कार्यक्रमाप्रसंगी देण्यात आला. यावेळी मनपाचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक अभिजित गंगावणे ,सतीश आगळे,गजानन लांडगे,सुरेश आसले, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या गारखेडा शाखेचे शाखाधिकारी अभिजित ठोंबरे, विनोद देशमुख, कैलास बोईते,योगेश पाटील,आनंद शिरसाट,गणेश काकडे,अर्जुन शेरकर व इतर सह कर्मचारी उपस्थितीत होते.