दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा-सुरेश ज्ञा. दवणे..
तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून, या सर्व निवडणुका १८ डिसेंबर रोजी होऊ घातल्या आहेत. त्या अनुषंगाने संबंधित गावागावांत राजकीय वातावरण गरम.निवडणुकीचे वारे घुमू लागल्याचे दिसत आहे. अशातच थेट सरपंच निवडीने अनेकांच्या इच्छांवर पाणी फेरले आहे. यापूर्वी चालणाऱ्या अडीच -अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्याचे गणित आता विघडणार आहे.
सध्या काही गावांमध्ये योग्य उमेदवार हवाय, असा एकच सूर मतदारांच्या तोंडून ऐकण्यास मिळत आहे. मात्र, अनेक पॅनल आपले राजनैतिक फंडे वापरताना दिसत असले तरी आता अनेक राजकीय नेत्यांचे अडीच-अडीच वर्षाचे गणित बिघडले आहे.
थेट सरपंच निवडणुकीतून आता योग्य उमेदवाराला गावाचा विकास करण्यासाठी पूर्ण पाच वर्षांचा कालावधी मिळणार आहे. पूर्वी गावात राजकारण लढणाऱ्या कोणत्याही एका पॅनलला बहुमत मिळाले नाही तर त्या पॅनलच्या उमेदवारांना उमेदवार कमी
पडत असेल तर बहुमत सिद्ध होणे कठीण होते. त्यामुळे पॅनलप्रमुख आपला सरपंच व्हावा, यासाठी अडीच – अडीच वर्षासाचा फॉर्म्युला वापरत होते. या फॉर्म्युल्यामुळे दोन्ही पॅनलच्या उमेदवाराला अडीच-अडीच वर्षांसाठी सरपंचपद मिळत असे. परंतु, यातही आधी माझ्या पॅनलचा सरपंच नंतर तुझ्या पॅनलचा असे वाद होत होते. मात्र, आता थेट निवडणुकीच्या माध्यमातून है वादही विकोपाला गेले आणि मतदार राजाच्या मताचे महत्त्व सरपंचपदाच्या उमेदवाराला समजू लागले.
अनेक गावांत होत असलेल्या निवडणुकांमध्ये काही जुने राजकारणी, तर काही नवनिर्वाचित युवा चेहरे राजकारणात उतरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मतदार राजाचा कल कुणाला योग्य उमेदवार निवडला जाणार की नाही, असे बोलले जात आहे. मात्र, गावात मुख्य ठिकाणी होणाऱ्या गप्पांमध्ये गावविकासासाठी तत्पर असणारा गावात विकासकामे खेचून आणणारा, भ्रष्टाचारमुक्त सरपंच आणि सदस्य हाच गावाचा विकास करू शकतो, असे बोलले जात
ज्या गावातून झाली सुरुवात त्या’ गावातच पुन्हा जनतेतून सरपंच
■ आधी गावातील सदस्य म्हणून निवडून आलेले प्रतिनिधी हे सरपंचपदासाठी उभ्या राहिलेल्या सदस्याला मतदान करून सरपंच निवडत होते. मात्र, गेल्या पाच वर्षाआधी सरकारने सरपंच हा जनतेतून निवडण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळेस प्रथमच अनेक गावांतील सरपंच जनतेमधून निवडून आले. त्यानंतर काही दिवसांनी राज्यात नव्याने सरकार बनले आणि थेट सरपंच निवडीचा निर्णय मागे घेतला. त्यावेळेस झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा सदस्यांतून सरपंच निवड झाली.
“आता पुन्हा राज्यात सरकार बदलले आणि जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय घेतल्याने आधी जेनतेतून सरपंच झालेल्या गावातच पुन्हा सरपंच हा जनतेतून होणार आहे.”
उपसरपंचपदासाठी होणार ओढा-ताण.निवडणुकामध्ये सरपंच निवड ही थेट
जनतेमधून होत असल्याने सरपंचासाठी होणारी रस्सीखेच थाबली. मात्र, तीच रस्सीखेच आता उपसरपंचपदासाठी होणार आहे. पूर्वी एखाद्या गटाला बहुमत मिळविण्यासाठी एखादा सदस्य कमी पडत असेल तर त्या उमेदवाराला उपसरपंचपद देऊन पॅनलमध्ये सामील केले जात होते.आता मात्र असे होणार नसल्यामुळे उपसरपंचपदासाठी रस्सी खेच होणार.
