
दैनिक चालू वार्ता हातकणंगले -कवि सरकार इ़गळी.
इंगळीत सध्या.ग्रा.प.निवडणूकीसाठी प्रचाराची रणधुमाळी जोरदार चालू असून प्रभाग पाच मध्ये इंगळेश्वर ग्रामविकास आघाडीचे सुरज अभय बुगटे,सौ,काजल विकास मोरे हे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले .तर एका जागेसाठी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भालचंद्र ऐतवडे हे रिंगणात आहेत. तसेच चेतन चौगुले या अपक्ष उमेदवाराने त्यांना पांठीबा दिलेने त्यांचा विजय निच्छित मानला जात आहे. जितेंद्र ऐतवडे हे एका सेवा सोसायटीचे संस्थापक असून त्यांना गावात मानणारा मोठा वर्ग असून त्यांचा शेतीशी निगडीत व्यवसाय असलेने लोकमत ही आहे.
आघाडीचे स्थानिक नेते माजी सरपंच रावसो पाटील,बाळासो नायकवडी, श्रीपती येळवडे,डाॅआण्णासाहेब पाटील,बाबूराव पाटील,प्रकाश खुडे,शांतीनाथ चौघुले,फिरोज नायकवडी , सरपंच पदाचे उमेदवार दादासो मोरे,व सर्वच इंगळेश्वर आघाडीचे कार्यकर्ते यांनी आघाडीने गेल्या पाच वर्षांतील विकास कामांचा लेखाजोखा मतदारांच्या प्रयंत पोहचवण्याचे कार्यों करीत असलेने आघाडीला प्रभाग चार मध्ये सरपंच पदासह तीनीही उमेदवारांच्या पाठीशी मतदारांचा कौल मिळत असलेचे दिसून येत आहे.