दैनिक चालू वार्ता संभाजीनगर प्रतिनिधी-पंडोरे शितल रमेश
==========================
संभाजीनगर:- 1)दलित व रहिवासी संरक्षण कायदा प्रमाणे वाहन चालकाना होणाऱ्या मारहाणीचा आळा बसवा या साठी यामध्ये कठोर कार्यवाही ची तरतुद करण्यात यावी .
म्हणजे अपघात समयी गाव गुंठा कडून,टोळ नाक्यावरील कर्मचारी,फायनस कंपनीचे गुंडवृत्ती चे गाड्या ओढणारी मुले ,पोलीस यांच्या कडून ड्रायव्हर ला होणारी मारहाणी स आळा बसेल.
2)क्रूझल,इनोव्हा,तवेरा,स्कार्पिओ ,इंटिका,व्हिंगर या पिवळया पट्टीच्या वाहनांसाठी प्रवासी क्षमता वाढवून मिळावी.तसेच इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य मध्ये पण मैक्सी कैवचे परमीट देण्यात यावे.
कारण येथे आपल्या महामंडळाच्या बसेस जात नाही येथे 108 लवकर पोहचवू शकत नाही त्या ठिकाणी क्रुझर सारखी गाडी खड्डे व घाट माध्यमाच्या रस्ते वरून सहज पणे चालते. त्या मुळे विहीर खोदताना सर्प देश,झाडावरून पडणे, डिलिव्हरी पेशंट इतर कारणाचे म्हणजे पाण्यात बुडने,जळणे अश्या अपघाती किंवा ईतर रुग्ण तसेच शाळकरी मुलं यांना शाळेत ने आन करू शकता व ग्रामीण भागातील विद्यार्थी नी देखील पुढील शिक्षण घेऊ शकनार आज देखील राज्यातील अनेक गाव खेडे मध्ये तीव्र उतार आणि चढाव असणारे रस्ते ,नाग मोडी वळणे, असणारे दुर्गम भागातील गाव ,खेड्यात शासनाच्या बसेस जात नही. तिथे जीप प्रकारची वाहने जातात. त्या साठी मैक्सी कैवचे परमिट वाहने असणे आवश्यक आहे.
जिल्हा ची ठिकाने सोडली तर तालुक्या च्या ठिकाणी सर्वांग पांढऱ्या पट्टी चे वाहने प्रवासी वाहतूक करतात . त्यामुळे शासनाचा देखील महसूल बुडतो,जर दुर्दैवाने अपघात झाला तर मृत्यू किंवा जखमी ना इन्सुरन्स कंपन्या क्लेम नाकारतात. व संबंधित वागणं मालकाचे देखील व प्रवासाचे देखील नुकसान होते त्या करीता मैक्सी कैवचे आवश्यकयात आहे.
3) ऑनलाइन चालन चालना मुळे वाहतूक विभागातील पोलीस कर्मचारी किंवा परिवाहणे अधिकारी यांच्या मध्ये पूर्वी जो सवांद होत होता तो सवांद बंद झालेला आहे. व त्या मुळे वाहन मालकणा कधी कधी विनाकारण आथिर्क भुदंडा चा सामना करावा लागतो. त्या मुळे हायवे पोलीस व परिवहन अधिकारी यांच्या मध्ये रोषा चे कारण व इतर चालन होत आहे. त्या करीता ऑनलाइन चाला न पद्धत बंद करून पूर्वी प्रणाने ऑनलाइन पद्धत चालू करावी.
4) चालकांची विश्रांती हीच सर्वांची सुरक्षा ,हे लक्षात घेऊन राज्यात च नव्हे तर संबंध देशातील पर्यटन स्थळ आणि धार्मिक स्थळी चालकांची विश्रांती ती ची सोया तरतूद करण्यात यावी.
कारण डिसेंबर च्या कडाक्यातील थंडीत, मार्च व एप्रिल व मे महिनेच्या ब गर्मीत ,आणि पावसाळ्यात धो धो कोसळणाऱ्या पावसात पत्र्याच्या टॅप असणाऱ्या साडे तीन फुटाच्या असणाऱ्या सीट वर पर्यटन ला निघालेल्या ड्रायव्हर रोज 500ते 600 की,मी गाडी चालून झोपेल कसा? झोप होणार नाही अपघाताला आळा बसेल कसा?
करिता अपघाताला आळा बसण्यासाठी सीट बेल्ट बरोबरच चालकांचा विश्रांती ची देखील प्रामुख्याने विचार व्हायला हवा.
5) हर जाती च्या धर्माच्या विकासासाठी आर्थिक महामंडळेआहेत
तर ड्रायव्हर जातीच्या विकासाचे सरकार वावडे का? करिता वाहन चालकाच्या स्वतंत्र आणि आर्थिक महामंडळाच्या झालेल्या घोषने ची त्वरित अंमल बजावणी करण्यात यावी.
जे ने करून जे शेतकरी,शेत मजुरांचे पुत्र शेती सोबत जोड धंदा म्हणून व्यवसाय करतात यांच्या वाहन चालकांच्या आर्थिक महामंडळ मुळे कर्ज मिळणे सोपं होऊन जाईल व खाजगी फायनान्स कंपनीच्या च्या अवाजवी व्याज आणि दंडा मधून मुक्तता होईल. व त्यांच्या दादागिरी ला पण आळा बसेल कारण पर्यंत खाजगी कंपन्यांला त्रासाला कंटाळून अनेक वाहन चालकांनी आत्महत्या देखील केलेल्या आहेत.
6) वाहन चालकांना जर शंभर टक्के किंवा पन्नास टक्के कायम स्वरूपी अपंगत्व आले तर 10 लाखांची मदत किंवा वाहन चालक अपघाती मृत्यूमुखी पडला तर त्यांच्या परिवारास तात्काळ सरकारच्या वतीने 25 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी.
कारण अनेक वेळा अपघात समयी अपघात ग्रस्त वाहनाचे इन्सुरन्स असते असते असे नाही. असेल देखील कुठलीच इन्सुरन्स कंपनी तात्काळ आर्थिक मदत करत नाही. अशा वेळी वाहन चालकांचे सम्पूर्ण कुटुंब देशोधडीला लागते, उदवस्त होते तसेच उपवर झालेल्या मुलीच्या किंव्हा बहिणीच्या लग्न ला अडथळे निर्माण होतात. कुटुंबातील वृद्ध माता पित्याच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. करीत अपघात ग्रस्त वाहन चालकांच्या परिवारास सरकारच्या वतीने तात्काळ आर्थिक स्थिती व्हावी.
7) स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजना कार्यवाही करावी तसेच 30 हजार रुपये 1 लाख रुपया पर्यत तरतूद करण्यात यावी. तसेच आपल्या राज्यातील प्रवासी इतर राज्या मध्ये देखील गेले आणि तिकडे दुर्दैवाने त्याचा अपघात झाला तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजना लाभ येते देखील मिळायला हवा . त्यांना त्या ठिकाणचा पासून आपल्या राज्यातील त्यांच्या ठिकाणचा पर्यंतचा सर्व खर्च सरकारच्या वतीने करण्यात यावा
कारण देव दर्शन साठी गेलेल्या सर्वत्र घरचे धनिक असतात असे नाही च ,,करिता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अपघात योजना वरील सुचवलेल्या बद्दलसह बद्दल करून कार्यवंहीत करण्यात यावी.
8) वाहन चालकांच्या तुटपुंज्या कमाई मूळे त्यांच्या मूल लेकराचा पुढील शिक्षण घेता येत नाही, हुशार होत करू मुलं देखिल वडिलांच्या नाजूक आर्थिक परिस्थिती मूळे शिक्षण पासून वंचीत राहतात. वाहन चालकांच्या पाल्या साठी विभागावर होस्टेल असावी. तसेच शहरी भागातील वाहन चालकां साठी मोफत गृह कुल योजना असावी.
9) आई बाप तसेच गुरुजांच्या सन्मान साठी महिला दिन,मातृदिन,पितृदिन,शिक्षण दिन,आहेत तसेच 17 सप्टेंबर हा वाहन चालक दिन म्हणून सरकार च्या वतीने अधिकृत घोषित करण्यात यावा. व त्यांच्या अनुसंघाणे प्रत्येक 17 सप्टेंबर हा वाहन चालक दिन निमित्त चालकांचा परिवहन अधिकारी तसेच हायवे पोलीस च्या वतीने सत्कार करण्यात यावा.
10) अवजड वाहन चालवणाऱ्या चालकांना10वी पास ची अट शिथिल करून7वी पास करावी आणि बांधकाम मजुरास दिल्या जणार्या सर्व सरकारी योजनाचं लाभ देण्यार यावा.
कारण की जे अवजड वाहन चालवणारे चालक असतात हे हेल्पर असतांनाच सर्व रोडवर च अवजड वाहने चालवून चालक झालेले असतात आणि जे साईटवर बांधकाम करतांना लागते ते सर्व साहित्य ची जे अवजड वाहन मधूनच केली जाते करिता
