दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा –
चंद्रपूर:- आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद / राष्ट्रीय बजरंग दल चंद्रपूर महानगराच्या वतीने मंगळवार, 20-12-2022 रोजी
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे पूर्व विदर्भ-प्रांत प्रभारी विभाग अध्यक्ष नंदू गट्टूवार यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूर महानगर व सर्व चंद्रपूर पदाधिकार्यांची विशेष बैठक सायंकाळी 7 वाजता वृंदावन नगर नंदू भाऊ गट्टूवार यांच्या घरी आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद चंद्रपूर जिल्हा महामंत्री अभिजित स्वान राष्ट्रीय बजरंग दल महानगर अध्यक्ष सुयोग खटी राष्ट्रीय छात्र परिषद चंद्रपूर जिल्हाध्यक्ष हेमंत बोमीडवार आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद चंद्रपूर शहर अध्यक्ष चेतन व्यास शिवा सरसर आकाश मारेकर गोपाळ जोशी रोशन त्रिपाठी हर्षल येरेवार राहुल वानखेडे अंकित कुंभारे गंगाधर हिवरकर दिनेश सारंग सोनू हिवरकर उपस्थित होते.
बैठकीत संस्थेचा आगामी कार्यक्रम व इतर विषयांवर चर्चा करण्यात आली.
राष्ट्रीय बजरंग दलाचे पूर्व विदर्भ प्रांत प्रभारी अध्यक्ष नंदू भाऊ गट्टुवार यांनी आपला विषय मांडताना सांगितले की आपण हिंदू धर्म रक्षा निधीवर अधिक भार द्यावा आणि जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधून हिंदु धर्म रक्षा निधी गोळा केला पाहिजे.डॉ.प्रविणभाऊ तोगडिया जी जानेवारी महिन्यात विदर्भात राहणार आहेत, हिंदू धर्म संरक्षण निधी चंद्रपूर मधून गोळा करून दिला जाणार आहे.
