
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
इंदापूर तालुक्यातील झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत २०१९ नंतर प्रथमच काॅंग्रेस ला माळवाडी ग्रामपंचायत मध्ये सदस्य बापू व्यवहारे यांच्या रूपाने यश मिळाले आहे.हर्षवर्धन पाटील यांनी काॅंग्रेस पक्ष सोडल्यानंतर इंदापूर तालुक्यामध्ये काॅंग्रेस चे अस्तित्वात संपुष्टात आले होते.
इंदापूर तालुका काँग्रेस चे माजी अध्यक्ष व नुकतेच भाजपावासी झालेले स्वप्निल सावंत यांना पक्षामध्ये एकजूट न राखता आल्यामुळे काॅंग्रेस पक्षापासून अनेक मातब्बर मंडळी नाराज झाली होती. काॅंग्रेस ला मानणारा मतदार ही दुरावला गेला होता.परंतु आज २०१९ नंतर इंदापूर तालुक्यामध्ये काॅंग्रेसचा पहिला सदस्य बापू व्यवहारे यांच्या रूपाने निवडून आला आहे.यामुळे आगामी काळात होणाऱ्या नगरपालिका, इंदापूर पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या भुमिकी कडे लक्ष रहाणार आहे
२०१९ नंतर इंदापूर तालुक्यातील पहिला काॅंग्रेसचा ग्रामपंचायत सदस्य झाल्याचा मला सार्थ अभिमान आहे.मला ४०१ मतं मिळाली असून हे यश इंदापूर तालुका काँग्रेस चे प्रभारी कार्याध्यक्ष तानाजी भोंग यांच्या मार्गदर्शनामुळे मिळाले असल्याचे मत नुतन काॅंग्रेस चे ग्रामपंचायत सदस्य बापू व्यवहारे यांनी व्यक्त केले.
इंदापूर तालुका काँग्रेस चे नामधारी डमी माजी अध्यक्ष सावंत पक्ष सोडून गेल्यामुळे काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी मोकळा श्वास घेतला असल्याचे मत काॅंग्रेसचे इंदापूर तालुका प्रभारी कार्याध्यक्ष तानाजी भोंग यांनी सांगितले. यामुळेच माळवाडी ग्रामपंचायत मध्ये बापू व्यवहारे हे विजयी झाले.यामुळे इंदापूर तालुक्यातील काॅंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.