
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
▪️ लसुन असल्याचे भासवत गोवंश तस्करी
▪️ ४२ गोशांची सुटका;२४ लाख ६६ हजार रुपयांचा माल जप्त
▪️ शिरजगाव कसबा पोलीसांची धडक कारवाई
—————————————-
अमरावती :- अमरावती ग्रामिण जिल्ह्याचे सिमेवरील मध्यप्रदेश राज्यातुन मोठया प्रमाणात कतली करिता गोवंश ची वाहतुक करण्यात येत असल्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत असल्याने सदर अवैध वाहतुकीवर निर्बंध घालणे याकरिता पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ,अमरावती ग्रामिण,अपर पोलीस अधिक्षक
शशिकांत सातव,अमरावती ग्रामिण यांचे आदेशान्वये जिल्हयातील महत्वाचे सिमाभागांवर नियमितपणे नाकाबंदी व पेट्रोलींग करून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
सदर मोहीमेत अंतर्गत बुधवारी रात्री पो.स्टे. शिरजगांव येथील पोलीस पथक गस्तीवर असतांना ग्राम बहीरम येथील आर.टी.ओ. चौकीजवळ एक टाटा आयशर क्रं. एम. पी. १३ / जी. बी. ५०६५ हा संशास्पद स्थितीत भरधाव वेगाने जातांना आढळुन आला, सदर वाहनास थांबविण्याचा प्रयत्न केला असता न थांबता वाहन पुढे निघुन गेले करिता सदर वाहनाचा पाठलाग करून थांबविले व वाहनाची झडती घेतली असता मागच्या बाजूला लसणाची पोती होती. सदर लसणाच्या पोत्यांच्या मागे बनविण्यात आले असून गोवंश ४२ (बैल) त्यांची कोणतीही चारा पाण्याची सोय न करता आखूड दोरीने अमानुषरित्या निर्दयतेने बांधून ठेवले असल्याचे दिसून आले.सदर गोवंशांची लगेच सुटका करून सुरक्षिततेच्या दृष्टीने गोशाळा नांदुरा येथे दाखल करण्यात आले आहे.आरोपी नामे संतोष भवरलाल लोधा, (वय५५), युनूस अली सत्तार अली(वय ४०) दोन्ही रा.सारंगपुर,जि.रायगड यांचे विरूध्द महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमान्वये कार्यवाही करून त्यांचे ताब्यातुन गोवंशासह आयशर व लसुन इत्यादी असा एकूण २४ लाख ६६ हजाराचा माल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई सपोनि प्रशांत गीते,पो.उप.नि.अमोल मानतकर,मार्गदर्शनात पो.अंमलदार मनोज पंडित,अजय कुमरे,सागर जाधव,सतीश पुनसे,अमोल कपले यांनी केली.