
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- ग्राहक जनजागृती अभियानांतर्गत अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत अमरावती जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामार्फत ग्राहक जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.या अंतर्गत अमरावती शहरी व ग्रामीण भागात उद्या शुक्रवार,दि. २३ ते २५ डिसेंबर या कालावधीत चित्ररथाव्दारे ग्राहकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यात येणार आहे.या अभियानांतर्गत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यालयात उद्या २३ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.पी.पाटकर यांच्या हस्ते चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन करण्यात येणार आहे.ग्राहकांच्या जनजागृतीसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्यामुळे ग्राहकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे प्र.प्रबंधक यांनी केले आहे.