
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा –
राज्यातील सत्तातरानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटाची पहिल्यांदाच एकत्र बैठक दिल्लीत पार पडली आहे. शिवसेनेतील मोठ्या फुटीनंतर पहिल्यांदाच दोन्ही गटाच्या नेत्यांमध्ये ही बैठक पार पडली आहे.
दिल्लीत शिवसेना कार्यालयात ठाकरे गटाचे खासदार आणि शिंदे गटाचे खासदार एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. या बैठकीत खासदार संजय राऊत यांच्यासह राहुल शेवाळे अनिल देसाई, यासह प्रियंका चतुर्वेदी या उपस्थित होत्या. याची दृश्ये आता समोर आली आहेत.
संसदेच्या शिवसेना कार्यालयात ही बैठक पार पडली. शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गटाचे खासदार आतापर्यंत कधीच समोरासमोर आले नव्हते. मात्र दिल्लीत एकत्र बैठकीत बैठकीत दिसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे खासदार राहुल शेवाळे यांनी दिशा सालियान प्रकरणात गंभीर आरोप केले होते. त्यावर संजय राऊत यांनीही जोरदार टीका केली होती. मात्र काही वेळानंतरच एकमेकांवर टीका करणारे खासदार एकत्र गप्पा मारताना दिसले. या बैठकीमध्ये नेमकी कशाबाबत चर्चा झाली याची माहिती समोर आलेली नाही.
संसदेचे सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे खासदारांना कामकाजाकरता संसदेत शिवसेनेची दोन कार्यालये असणार का याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र सध्या तरी शिवसेनेचे कार्यालय एकच असल्याचे पाहायला मिळत आहे. याआधी कार्यालयात शिंदे गट असेल तर ठाकरे गटाचे खासदार तिथे जात नव्हते. ठाकरे गटाचे खासदार तिथे असताना शिंदे गटाचे खासदार तिथे जात नव्हते. मात्र आता दोन्ही गटाचे खासदार एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.
याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यामध्ये दोन्ही गटाचे खासदार एकत्रपणे गप्पा मारताना, हसताना आणि चर्चा करताना दिसत आहेत. दुसरीकडे खासदार राहुल शेवाळे यांनी माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. राहुल शेवाळे यांच्या आरोपांनतर राज्याच्या हिवाळी अधिवेशनातही याचे पडसाद उमटले. अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्तीला A U नावाने 44 फोन कॉल्स आले होते. हे A U म्हणजे आदित्य-उद्धव असल्याची माहिती बिहार पोलिसांनी दिल्याचा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी केला होता.
आता हिचं नेती एकत्र गप्पा मारताना दिसतात आता जनतेनी आणि दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी काय समजायचं?
डि. एस. लोखंडे पाटील
मुख्य संपादक – दै चालु वार्ता