
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक- मोहन आखाडे
औरंगाबाद येथे सर विश्वेश्वरय्या सभागृह , सिंचन भवन औरंगाबाद येथे कृतिशिल निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटनेची बैठक इंजी.श्री इ.बी.जोगदंड साहेब सेवानिवृत्त मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक लाभक्षेत्र विकास यांचे अध्यक्षतेखाली पार पडली, श्री गिरीष सांगळे उप अभियंता जलसंपदा विभाग पूणे हे प्रमुख पाहुणे व कृतिशिल संघटनेचे कार्याध्यक्ष इंजी.श्री मनोहर कि.पोकळे यांचा औरंगाबाद जिल्हा प्रवर्तक श्री आर.डी.करपे व श्री एन.डी.मोहिते यांच्या हस्ते मान्यवरांचा पुष्पगुच्छ देउन सत्कार करण्यात आला.या सभेत संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष इंजी. श्री मनोहर कि. पोकळे मुख्य अभियंता व सहसचिव पाटबंधारे विभाग (सेवानिवृत्त) यांनी उपस्थित सेवानिवृत्त सभासद सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच संघटनेचे उद्दीष्ठे व कार्याबाबत उपस्थितांना माहिती दिली. या प्रसंगी इंजी.श्री मनोहर पोकळे साहेबांनी या सेवानिवृत्त कृतिशिल संघटनेची निर्मिती कशासाठी झाली तसेच संघटनेचे उद्दीष्ठे व ध्येय धोरणे काय,सभासंदांना संघटनेचा सेवानिवृत्ती काळात त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कसा लाभ होईल त्यांचे प्रलंबित प्रश्न जलदगतीने कसे सोडविता येतील याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.या बैठकीत जलसंपदा विभाग, जल संधारण, सार्वजनिक बांधकाम विभाग, भुजल सर्वेक्षण, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग , सामाजिक वन विभाग,यासह विवीध विभागातील अनेक सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित राहीले या बैठकीत अनेक सभासदांना रितसर अर्ज भरून संघटनेचे सदस्यत्व देण्यात आले तसेच औरंगाबाद जिल्हा स्तरावर नुतन कार्यकारीणी गठीत करण्यात आली या कार्यकारीणीत श्री इंजी. श्री इ. बी. जोगदंड मुख्य अ.मु. प्रशासक सेवानिवृत्त यांची सर्वानुमते औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली… तर श्री सुभाष परळीकर यांना उपाध्यक्ष तथा कायाध्यक्ष हे पद देण्यात आले, सचिव पदी श्री रावसाहेब कळसे , सूर्यकांत पाठक यांना कोषाध्यक्ष, श्री एन. टी. कल्यानकर सह कोषाध्यक्ष , एन.डी.मोहीते- सहसचिव – श्री एकनाथ घोडके. संघटक, इंजी.श्री ए.एन.सुरवशे संघटक , श्री आर. डी. करपे संघटक , तर महिला संघटक म्हणून सौ विणाताई ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली.. सभेचे आयोजन संघटनेचे औरंगाबाद जिल्ह्याचे प्रवर्तक श्री आर. डी. करपे व श्री एन.डी. मोहीते यांनी केले होते.
श्री अशोक इंगळे, इंजी.श्री डि.बी. कुलकर्णी, श्री रावसाहेब कळसे यांनी कार्यक्रमाचे शुभारंभी कविता प्रस्तुत केल्या समारंभाचे सूत्र संचलन श्री एन डी. मोहीते यांनी केले, तसेच बैठकीचे प्रास्ताविक आणि समारोपाचे आभारप्रदर्शन श्री आर. डी. करपे यांनी केले