
दैनिक चालू वार्ता नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी- समर्थ दादाराव लोखंडे
————————————————————————-
बीड (दिनांक 23 डिसेंबर): अंशदायी पेंन्शन योजना रद्द करून सर्वांनाच जुनी पेंन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन संघटनेने सेवाग्राम ते नागपूर आयोजित पेंन्शन संकल्प यात्रेस मराठवाडा शिक्षक संघाने सक्रीय पाठिंबा दिला असून प्रचंड संख्येने सहभागी होऊन शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांनी आपली ताकद दाखवून द्यावी असे आवाहन मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव आणि सरचिटणीस राजकुमार कदम यांनी केले आहे.
या बाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील आजी माजी राज्यकर्त्यांनी जुन्या पेंन्शन बाबत घेतलेली भूमिका अतिशय संतापजनक आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या पेंन्शन बाबत घेतलेली भूमिका एकसारखीच आहे. पवार आणि फडणवीस स्वतः साठी अतिशय आकर्षक पेंन्शन योजना घेत असताना कर्मचारी शिक्षकांना मात्र अतिशय बोगस कुचकामी असलेली अंशदायी पेंन्शन योजनेचे समर्थन करतात, ही शरमेची बाब आहे. अंशदायी पेंन्शन योजनेतील फोलपणा लक्षात आल्यावर राजस्थान, पंजाब, दिल्ली, झारखंड, छत्तीसगड या राज्यांनी जुनी पेंन्शन योजना लागू केली आहे. महाराष्ट्रातील कर्मचारी शिक्षकांची जुनी पेंन्शन योजना लागू करावी अशी भावना आहे. सरकारच्या जुनी पेंन्शन योजना लागू करण्या बाबतच्या नकारात्मक भावनेमुळे कर्मचारी शिक्षकां मधे प्रचंड रोष आणि असंतोष निर्माण झाला आहे. तो व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन संघटनेने सेवाग्राम ते नागपूर ‘पेंन्शन संकल्प’ यात्रा आयोजित केली आहे. या संकल्प यात्रेस मराठवाडा शिक्षक संघाने सक्रीय पाठिंबा जाहीर केला असून मराठवाड्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक, प्राध्यापक यांनी प्रचंड संख्येने सहभागी होऊन आपला असंतोष आणि रोष व्यक्त करावा असे आवाहन मराठवाडा शिक्षक संघाचे मार्गदर्शक पी.एस. घाडगे, व्ही.जी. पवार, अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव, सरचिटणीस राजकुमार कदम,सहसचिव सौ.रेखा सोळूंके ,जिल्हाध्यक्ष व्यंकटराव चिलवरवार ,सचिव रविद्र वाकोडे ,कार्याध्यक्ष बी.डी.जाधव ,कोषाध्यक्ष आर.पी.वाघमारे ,के.का.स.जी.पी.कौसल्ये ,ई.डी.पाटोदेकर शहराध्यक्ष डी.बी.नाईक ,सचिव टिमकीकर बी.एम,कार्याध्यक्ष राजेश कदम,महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ.विजयालक्ष्मी स्वामी,प्रज्ञा सांगवीकर ,उत्तम लाठकर ,गणेश बडुरे ,आनंद मोरे,एम.एस.मठपती ,क्लायमेंट अल्डा,शिवराज कदम,विजय खुनिवाड ,आर.पी.ब्याळे,अनिल सुगावकर ,संजय केंद्रे ,संभाजी पाटील बुडे,श्रीगीरे सर,प्रा.कर्णे ,शिवानंद स्वामी,विनोद भुताळे ,रणखांब सर,किशन केंद्रे यांच्यासह सर्व पदाधिका-यांनी केले आहे.