
दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा दोन वर्षांनंतर प्रथमच भरली असून या यात्रेत दि.२३ डिसेंबर रोजी नांदेड जि.प. च्या वतीने भव्य अश्व व श्वान प्रदर्शनाची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती पण या स्पर्धेत भाग घेण्यासाठी लोहा तालुक्यातील सायाळ येथील सरपंच तथा शेतकरी अण्णाराव पाटील यांच्या बबलु नावाच्या अश्वाने (घोड्याने) प्राण सोडले प्रशासकराजमुळे यात्रेचे नियोजन ढेपाळले .या अश्वावर उपचार करण्यास पशुसंवर्धन विभागाचे पशु वैद्यकीय अधिकारी अपयशी ठरले त्यामुळे सरपंच तथा शेतकरी अण्णाराव पाटील पवार यांचे अंदाजे ४ ते ५ लाख रुपयांचे नुकसान झाले.
तेव्हा अश्व मालक अण्णाराव पाटील पवार यांना नांदेड जिल्हा परिषदेने नुकसान भरपाई म्हणून तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी यात्रेकरू कडून होत आहे.