
दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
आज दि. २४ रोजी माळेगाव यात्रेत भव्य कुस्त्यांचे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यंदा लोहा पं.स. च्या वतीने बक्षीसात ही वाढ करण्यात आली असून शेवटची कुस्ती ३१ हजारांची आहे.तर अन्य कुस्त्यां च्या बक्षीसात ही वाढ करण्यात आली आहे.
यंदा प्रशासक काळात प्रथमच कुस्त्यांचे बक्षीसात वाढ झाली असली तरी लवकर पं. स. प्रशासनाने लवकर कुस्त्यां लावून पारदर्शकता आणावी व नसता कागदावर कुस्त्या लावून येरे माझ्या मागल्या म्हणी प्रमाणे होऊ नये अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.