
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा…दहा रुपयांचे नाणे सुरू असून ते चलनाचा एक भाग आहे असे रिझर्व बँकेने सांगितले असले तरी शहरासह तालुक्यातील किरकोळ व्यापाऱ्यांकडून व ग्राहकांकडून नाणे स्वीकारण्यास टाळाटाळ होत आहे. दहा रुपयाच्या नाण्याबाबत तालुक्यात अनेक अफवांना उधान आले असून दहा रुपयांच्या नाण्याबाबत असलेला गोंधळ संपता संपेना म्हणावयाची वेळ येऊन पडली आहे.
दहा रुपयचे नाणे राज्यभर चलनात आहे. मात्र शहरासह तालुक्यातील नागरिक, व्यापारी व छोटे मोठे दुकानदार नाणे घेण्यास नकार देत आहे. तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून कुठलाच व्यापारी अथवा ग्राहक दहा रुपयाचे नाणे स्वीकारत नाही. तालुक्यात दहा रुपयाच्या नाण्याबाबत वेगवेगळ्या अफवा पसरलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक जण दहा रुपयाचे नाणे घेण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहे.