
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – कवी सरकार इंगळी
हातकणंगले – संत गाडगे महाराज विचारमंच महाराष्ट्र राज्य ओतूर,पुणे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच मांजरी हडपसर(पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने, रविवार दि.२५/१२/२०२२ रोजी विविध साहित्यकृती राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा २०२२ आणि कवयित्री कांचन मून लिखित -‘अंतर्मन’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच शिक्षक भवन ,गांजवे पेठ पुणे येथे पार पडले.
याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजनजी लाखे (अध्यक्ष मसाप पिंपरी चिंचवड) ,उदघाटक म्हणून अनिलजी गुंजाळ(माजी शिक्षणाधिकारी जि.प.पुणे) उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून जयवंतजी अवघडे (माजी रजिस्टार फर्ग्युसन कॉलेज पुणे), अनिलजी आबनावे (संचालक कँटोमेन्ट बँक पुणे),शिवाजीराव चाळक (संस्थापक शिवांजली साहित्यपीठ चाळकवाडी) , हणमंतजी क्षीरसागर (जेष्ठ साहित्यीक ,पुणे), शामला पंडित (जेष्ठ साहित्यिका, पुणे), संदीपजी सातपुते (मुख्याध्यापक विमलाबाई लुंकड विद्यालय गुलटेकडी), स्वागताध्यक्ष सचिन भरणे आणि हृदयमानव अशोक(दिग्दर्शक,पटकथालेखक,अभिनेता) उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी विविध साहित्याचे परीक्षक म्हणून भरत सुरसे, मसूद पटेल, विजय अंधारे,विजय लोंढे उपस्थित होते.
दोन्ही साहित्यिक विचारमंचाच्या वतीने प्रत्येक विभागातील दोन उल्लेखनीय साहित्यकृतींना राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
यामध्ये ‘संत गाडगे महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यलेखन पुरस्कार ‘प्राप्त साहित्यिकामध्ये माधुरी काकडे दौंड , हबीब भंडारे संभाजीनगर (काव्य ) संजय गोराडे नाशिक , प्रा.विद्याधर बन्सोड चंद्रपूर (कादंबरी ), यशवंत माळी कवठेमहांकाळ ,हरिश्चंद्र पाटील टेंभुर्णी (कथा), मुरहारी कराड लातूर ,सचिन बेडभर (बालकाव्य), प्रा.जयसिंग गाडेकर आळे जुन्नर, प्रसन्नकुमार धुमाळ (गझल) , भागवत माळी पुणे,कमल कदम नांदेड (आत्मचरित्र), इंद्रजित पाटील बार्शी, स्व.शब्बीर मुलाणी सोलापूर (चरित्र) , अरुण नवले सोलापूर, बालिका बरगळ हिंगोली (संतसाहित्य) आणि रश्मी गुजराथी पुणे (बालकथा) तसेच संत नामदेव महाराज लेख स्पर्धेचे निकाल अनुक्रमे -विद्या साबळे सोलापूर -प्रथम, चंचल जाधव नाशिक- द्वितीय, विजय जंगम सांगली-तृतीय, डॉ.अलका कुलकर्णी मुंबई -चतुर्थ तर रेखा फाले पुणे -पाचवा मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.यावेळी महाराष्ट्रभरातून आलेले पुरस्कार्थी व त्यांचे नातेवाईक, साहित्यिक बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
तर रणजित पवार यांच्या वतीने उपक्रमशील पदाधिकाऱ्यांचा ‘संत गाडगे महाराज राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.यामध्ये राजेश साबळे (अध्यक्ष),कविता काळे (सचिव), अर्चना नेवकर (सहसचिव) कांचन मून (संघटक) , गणेश पुंडे (कोषयध्यक्ष),सौरभ नवले (सहसंघटक), रघुनाथ कांबळे (समन्वयक), मीनल कुडाळकर (समन्वयक), अनिल नाटेकर (समन्वयक) आणि सीताराम नरके (मार्गदर्शक)इत्यादींचा समावेश आहे.
उडघटकांच्या हस्ते दिपप्रजवलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात संविधानातील उद्देशिका वाचनाने करण्यात आले.प्रास्ताविक गणेश पुंडे, प्रस्तावनापर मनोगत कविता काळे, पुस्तकाविषयी मनोगत कांचन मून , सूत्रसंचालन अनुक्रमे -अर्चना नेवकर ,शुभांगी शिंदे आणि सौरभ नवले यांनी केले.तर आभार रणजित पवार यांनी मानले.कार्यक्रमाचा समारोप अनिल नाटेकर यांनी संत गाडगेबाबांच्या पसायदानाने करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता दोन्ही संस्थेचे पदाधिकारी कांचन मून,कविता काळे, राजेश साबळे, रघुनाथ कांबळे, गणेश पुंडे, सचिन भरणे, सौरभ नवले जोत्सना काळे ,तन्वी काळे, सत्यजित पवार यांनी अधिक परिश्रम घेतले. अशी माहिती संत गाडगे महाराज विचारमंचाचे संस्थापक रणजित पवार यांनी दिली.