
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे…
मंठा यावर्षी सुरुवातीपासून पावसाने पिच्छा उचला होता नंतर परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. होते. महसुल विभाग कृषी विभागाकडून नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण सुद्धा करण्यात आले होते. आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत सुद्धा जाहीर केली होती परंतु नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेली मदत दिवाळी सणालासुद्धा मिळालीच नाही त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली. आता दिवाळी होवुन दोन महिन्यांचा कालावधी लोटला असतांनाही अद्यापही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कुठलीच मदत मिळाली नाही. त्यात खाजगी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या विदारक परिस्थितीचा फायदा घेत कापसाच्या
भावात सातत्याने चढ-उतार करण्याचा सपाटा सुरू केला आहे.
मागे दिवाळी सण लक्षात घेता शेतकऱ्यांना कापूस विकण्याशिवाय पर्याय नव्हता त्याचाच फायदा घेत खाजगी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या कापसाची फक्त ७ हजार रुपये क्विंटल प्रमाने अगदी मातीमोल भावात खरेदी केली होती.
त्यानंतर दिवाळी सण उलटताच ७ हजार रुपये भाव असलेल्या कापसाचे भाव ९ हजारांच्यावर वाढले होते आणि आता शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी पैशाची आवश्यकता असल्याचे पाहून कापसाचे भाव परत खाजगी व्यापाऱ्यांकडून पाडण्यात आल्याने आता कापसाचे भाव 7 हजारापर्यंतच असल्याने शेतकरी चांगलाच चिंतेत सापडला आहे मागे ९ हजार रुपयांच्या वर गेलेल्या कापसाला दहा हजार रुपये क्विंटल प्रमाणे भाव नक्कीच मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती मात्र परत कापसाचे भाव कोसळल्याने शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडून गेला आहे रब्बी हंगामाची लागवड करण्याकरिता नाईलाजाने शेतकऱ्यांना गरजेपुरता कापूस अगदी
मातीमोल भावात विकावा लागत आहे शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कापूस बाहेर काढण्यासाठी कापसाचे भाव तर पाडण्यात आले नसतील ? अशा बद्दलचे शेतकऱ्यांमध्ये बोलल्या जात आहे रब्बी पिकांच्या लागवडीसाठी पैशांची शेतकऱ्यांना नितांत गरज असतांना कापसाचे भाव खाजगी व्यापाऱ्यांनी आता केवळ 7 हजारांवरच आणल्याने कापसाला १० हजार रूपये क्विंटलचा भाव नक्कीच मिळणार अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु कापसाचे भाव सतत कोसळत असल्याने आशेवर बसलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे आता तरी शासनाने कापसाचे भाव वाढवण्यासाठी पाऊले उचलावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.