
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा बाळासाहेबाची शिवसेना मंठा तालुका कार्यकारणी जाहीर झाली असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे यांनी दिली आहे.
या प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे की, स्व.बाळासाहेब ठाकरे स्व.धर्मवीर आनंद दिघे व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, जिल्ह्याचे नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर युवा सेना राज्य विस्तारक सदस्य अभिमन्यू खोतकर यांचे विचार आपण तळागाळापर्यंत पोहोचून पक्षाची ताकद वाढवून येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद जास्तीत जास्त उमेदवार आपल्या पक्षाची निवडून येतील या दिशेने कार्य करून गावा गावात हा बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या विचार पेरण्याचे काम जोमाने आणि एकविचाराने करावयाचे आहे.
या करिता संघटन फार महत्त्वाचे असून मंठा तालुका कार्यकारिणी उप तालुकाप्रमुख गजानन कापसे कार्यक्षेत्र पाटोदा सर्कल, उपतालुकाप्रमुख विलास राठोड कार्यक्षेत्र खुराडसावंगी सर्कल दलित आघाडी तालुका अध्यक्ष दिलीप हिवाळे, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष चांदभाई पठाण युवा सेना उपतालुकाप्रमुख लिंबाजी बोराडे युवासेना शहर प्रमुख ॲड राजेश खरात, जयपुर उपसर्कल प्रमुख पदी विनोद केंदळे आदींची निवड बाळासाहेबाची शिवसेना कार्यकारणी मध्ये आल्याची माहिती तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे यांनी दिली आहे.
या कार्यकारिणीची निवड संपर्कप्रमुख पंडित भुतेकर जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे यांनी केले असल्याचे प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.