
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी ठाणे शहापूर-
अखिल भारतीय मागासवर्गीय समाज प्रबोधन संस्था संचलित
आदिवासी कातकरी मुला मुलींची अनुदानित आश्रम शाळा बाबरे ता. शहापूर, जि- ठाणे येथे आंतरशालेय 2022- 23 क्रीडा मोहोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन सहायक पोलीस निरीक्षक किन्हवली विभाग कमलेश बच्छाव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे सचिव अतुल भडांगे , संचालिका शीतल गायकवाड , शाळेच्या माध्यमिक चेअरमन पूनम भडांगे , कार्यकारी चेअरमन संतोष पडवळ , जिल्हास्तरीय महिला दक्षता समिती सदस्य तथा माध्यमिक मुख्याध्यापिका आशा नवनाथ रणखांबे, तसेच प्राथमिक मुख्याध्यापक कपिल सातपुते , क्रीडा प्रमुख विवेक पष्टे , संदीप भालके आणि शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते.