
दैनिक चालू वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
उस्माननगर : –
शिराढोण ता.कंधार येथील कै. भानुदास यन्नावार व्यायाम शाळा व क्रिंडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीक्षेत्र माळेगांव यात्रेमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृतीतून समाज प्रबोधनावरील गिते सादरीकरण करून वाहवा मिळवली….
दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली श्री क्षेत्र खंडोबा यात्रा माळेगाव या ठिकाणी दि.२३ व २४ डिसेंबर २०२२रोजी माळेगाव यात्रेत पाणी स्वच्छता सम्रुध्द आरोग्यासाठी जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतिने उभारन्यात आलेल्या स्टाॅलमधे “कै.भानूदास यन्नावार व्यायाम शाळा व क्रिडा मंडळ शिराढोण ता.कंधार या मंडळाने.
“बाबा ..नी मामा..काका,.. नी दादा मी सांगते खरोखर….
संडास बांधा घरोघर,…..
घानीच पाणी साचत असत दारामधी…..
रोगराई सारी तुम्हीच आणता घरामधी…..!
नदीमुळे मिळे पिण्या सर्वा पाणी….
स्वच्छ ठेवा तीला तनमन धनानी….. या गीतातून जनतेला पाण्याची बचत व परिसर स्वच्छ ठेवा असे गितातून संदेश दिला.स्वच्छतेवरील गिताला रसिकांनी भरभरून टाळ्याचा प्रतिसाद दिला. उपस्थिती मान्यवराचे मने जिंकली .
समाज प्रबोधनावरील विविध गीते शाहिर बापुराव जमदाडे,गायिका नालंदा सांगवीकर,ढोलकी गंगाधर एडके,संजय कांबळे,हार्मोनियम सुमेध एडके,भुजंग कांबळे,कवी गौतम सांगवीकर,झांज गोविंद गोमस्कर,कोरस महाजन पटेकर व दता सोनकांबळे इ.कलावंतानी आपली कला सांस्कृतिक कार्यक्रमातून यात्रेमध्ये स्वच्छते विषयी जनजागृती पर प्रबोधन केले.
या प्रसंगी या विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायन मिसाळ ,सेवानिवृत उपमुख्य कार्यकारी अधिकारी उत्तमराव इंगोले,सेवा निवृत गटविकास अधिकारी उमाकांत रहाटीकर,गटविकास अधिकारी राजू तोटावार,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक मिलिंद व्यवहारे,राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवाजी टोम्पे,माहिती शिक्षण व संवाद सल्लागार डाॅ.नंदलाल लोकडे,गट समन्वयक लक्ष्मीकांत टाकळकर,दत्तात्रय इंदूरकर,नागेश स्वामी,संतोष कांबळे,प्रदीप वाठोरे,बाळासाहेब शिंदे,सुरेश हिमगीरे आदींची उपस्थीती होती.यावेळी कलापथकाचे अनेकांनी कौतुक केले.