
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी-दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : जिल्ह्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक, धर्मस्थळं आणि विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून महाराष्ट्र सरकारतर्फे तो वारसा जोपासला जाईल, शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली एवढेच नाही तर त्यासाठी राखीव असलेल्या तीन टक्के अनुदानाची रक्कम तातडीने अदा केली जाईल, असे अभिवचन राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सभागृहात दिले.
परभणी जिल्ह्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक, श्रध्दा स्थळांचा आणि विविध तीर्थक्षेत्रांचा पूर्वापार वारसा लाभला आहे. कलेला तोड नाही अशा असंख्य वास्तू आहेत, ज्यांचा आजपर्यंत कधी विकासच करण्यात आला नाही. परिणामी त्या भकास झाल्या आहेत. हजारो वर्षांपूर्वी निर्माण ही धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, धर्मस्थळ आणि तीर्थक्षेत्रांची स्थळं विकासापासून वंचित, दूर्लक्षित राहिल्यामुळे ती भकास, भग्न बनली जाऊन त्यातील विविधांगी कला-कृतीच लोप पावली गेली आहे. अगदी हेमाडपंथी मंदीरांचा आणि असंख्य बारवांचा सुध्दा त्यात समावेश आहे.
याप्रकरणी जिंतूरच्या भाजपा आमदार मेघना ताई बोर्डीकर यांनी विधानसभेत आवाज उठवून शासनाचे लक्ष्य वेधले होते तर तिकडे गंगाखेड चे रासपा आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी धारासूरच्या हेमाडपंथी महादेव मंदीराचे या विकासाचा प्रश्न लावून धरला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यासाठी लागणाऱ्या सुमारे २१ कोटींचा निधी औरंगाबाद येथील कार्यक्रमात मंजूरही केला गेला आहे परंतु ती रक्कम अद्याप अदा करण्यात आली नासल्यामुळे त्यांनीही आजच्या लक्ष्यवेधी तून शासनाचे लक्ष्य केंद्रीत केले आहे.
आ. बोर्डीकर यांनी जिंतूर तालुक्यातील राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराजांची जन्मभूमी असलेले पाचलेगाव, ह.भ.प. गुरुवर्य रंगनाथ महाराज परभणी कर यांची जन्मभूमी सोनपेठ, महाराष्ट्र भूषण, संत मारोतराव महाराज दस्तापूरकर यांचे समाधीस्थळांच्या विकासाचे प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावणे, शे-सव्वाशे मंदीरं, श्रध्दास्थळं आणि असंख्य बारवांच्या जिर्णोध्दार व विकासाकडे शासनाचे लक्ष्य वेधून निधी उपलब्ध केला जावा अशी मागणी केली होती. त्यावर बोलताना राज्यभरातील सर्वच धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, तीर्थक्षेत्र आणि श्रध्दा स्थळांच्या विकासासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही ना. मुनगंटीवार यांनी सभागृहात दिली. त्यामुळे राज्यभरातील विकासापासून वंचित, दूर्लक्षित ही स्थळं येणाऱ्या काळात लवकरच विकासाभिमुख बनले जातील, त्याला भरीव चालना मिळू शकेल असा आशावाद लाखो भाविक भक्तांमध्ये निर्माण झाला आहे, असं म्हटलं तर मुळीच चुकीचं ठरणार नाही.
निजामकालीन राजवटीमध्ये मराठवाड्यातील असंख्य मंदीरं, धर्मस्थळं भग्न करण्यात आली होती. अस्तित्वात असलेली पुरातन स्थळं विकासापासून दूर्लक्षित झाली आहेत. मराठवाडा स्वातंत्र्य संग्रामावेळी निजामाविरोधात संघर्ष करण्यासाठी याच संत- महात्म्यांनी आंदोलनात सहभाग घेऊन मोठी चळवळ उभारली होती. ज्यामुळे समस्त जनतेचे निजामा विरोधात स्फुलिंग पेटले गेले होते. असे सांगून मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृतमहोत्सवी सोहळा साजरा करीत असतांनाच या संत महात्म्यांच्या जन्मभूमी, कर्मभूमीतील विकासाचा अनुशेष भरून काढावा अशी मागणी आ. बोर्डीकर यांनी केली होती.
अनेक सुबक कुशलता व दूरदृष्टी वापरुन त्याकाळी वैभवशाली अशा कलाकृतीच्या माध्यमातून बनवल्या गेलेल्या बारवांची मोठ्याप्रमाणात पडझड झाली आहे. त्यांच्या साफसफाई करण्याच्या मोहिमेत आ. बोर्डीकर यांनी सहभाग घेतला होता हे विसरून चालणार नाही. हे खत वैभव परभणी जिल्ह्याला बघायला, वापरायला व दर्शनाचा लाभ घ्यायला पुन्हा भाग्य लाभले जावे असा आशावाद व्यक्त करुन आ. बोर्डीकर यांनी हे सर्व विषय शासनाकडे लावून धरले होते. त्याच अनुषंगाने सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवर यांनी वरील प्रमाणे आश्वासित करुन लवकरच निधी अदा केला जाईल असे सांगितले.
दरम्यान नांदेड जिल्हा आणि लोहा-कंधार तालुक्यातील गतकालीन तीर्थक्षेत्र अंतेश्वरचा आणि ह.भ.प. सद्गुरु शंकर भारती महाराज यांचे समाधीस्थळ, हजारो भाविक भक्तांसाठी भव्य अशा सभागृहाच्या विकासाला चालना देऊन सुशोभित बांधकाम केले जावे अशी मागणी समाजसेवक, भूमी पुत्र व पत्रकार म्हणून दत्तात्रय वामनराव कराळे यांनी समस्त जनतेच्या वतीने करण्यात येत आहे. याप्रकरणी नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी तातडीने लक्ष घालणे व महाराष्ट्र शासनाकडून धर्मस्थळांसाठी आरक्षित तीन टक्के निधी मंजूर करुन घेतल्यास अंतेश्वर या क्षेत्राला पुन्हा गतवैभव प्राप्त होऊ शकेल.