
दैनिक चालू वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
जालना शहरात नगरपालिका हद्दीत भोकरदन नाका राजुर चौफुली ते कन्हैया नगर, तसेच मोंढा ते भोकरदन नाका, विशाल कॉर्नर राजुरी कॉर्नर ते मुंडे चौक या रस्त्यावर काही आधुनिक लोकांनी अतिक्रम केले असून यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना वयो वृद्ध खूप त्रास सहन करावा लागतो या रस्त्यावर अतिक्रमण असल्याने विद्यार्थ्यासोबत खूप अपघात घडतात अनेक मुले आज अधू झाले आहे तसेच या रोडवर मॉर्निंग करण्यासाठी सकाळी व सायंकाळी तरुण-तरुणी वयो वृद्ध येतात परंतु अपुऱ्या रस्त्यामुळे छोटे-मोठे अपघात घडून अनेकांना बळी देखील गेले आहेत. मात्र प्रशासन याकडे कांडोळा करत आहे त्याचबरोबर राजुर चौफुली ते मोंढा या रस्त्यावर देशी दारूचे दुकान असून तेथील येथील दारुडे हे येणारे जाणाऱ्या मुलीची महिलाची छेड काढतात, तसेच या ठिकाणावरून मार्केटमध्ये येणारे शेतकऱ्यांना आढळून त्यांना चाकूचा धाक दाखवून लुगडतात या ठिकाणी असलेल्या दारूचे दुकान तात्काळ बंद करण्यात यावे, तसेच शासकीय असलेल्या 50 फुटाचा रस्ता मोकळा करून नंतर सर्विस रोड खुला करण्यात याव,तसेच या रोडवरील अनाकृत लावलेले होल्डिंग व बॅनर्स काढण्यात यावे या बॅनरमुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही व अपघात करतात. असे निवेदन राजेंद्र सलामपुरे व संतोष सलामपुरे घनश्याम खाकी वाले यांनी दिले जिल्हा अधिकारी यांना निवेदन दिले.