
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक -मोहन आखाडे
नाशिक येथे वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडी आयोजित वंजारी समाजाचे पहिले राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन ऐतिहासिक आणि उत्साह पुर्ण परिस्थिती मध्ये पार पडले . साहित्यातील सम्राट कुसुमाग्रज यांच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथील स्मृतीला पुष्प अर्पण करून सकाळी नऊ वाजता ग्रंथ दिंडी उत्साहात सुरुवात झाली रस्त्यात राष्ट्र पुरूष क्रांतीकारक स्वर्गिय व्हि एन नाईक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व्हि एन नाईक शिक्षण संस्था प्रांगणातील स्वर्गिय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दिंडी उत्साहात कार्यक्रम स्थळी पोहली. मुख्य उद्घाटन सोहळा हिंदीवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर, विद्येचे दैवत सरस्वती राष्ट्र संत भगवान बाबा, संत अवजीनाथ महाराज व्हि एन नाईक साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन विदर्भ रत्न कांदबरी बाबाराव मुसळे संमेलन अध्यक्ष प्रा वा ना आंधळे,ह भ प डॉ तुळशीदास महाराज गुट्टे, महाराष्ट्र भुषण उद्योग रत्न उद्योगपती बुधाजीराव पानसरे ,वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष व्हि एन नाईक शिक्षण संस्था नाशिक चे माजी अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, गणेश खाडे, ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत काकासाहेब खांबाळकर, भटके विमुक्त घुमांतुक परिषद राष्ट्रीय उपाध्यक्षा सौ कांचनताई खाडे , वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य चे राज्य सरचिटणीस डॉ लक्षराज सानप, वंजारी वंजारा सेवा संघाचे , राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव खाडे , डॉ विजय दहिफळे, महाराष्ट्र भुषण के के सानप,आरती मोराळे,कामा हॉस्पिटल चे डिन डॉ तुषार पालवे , माधुरी ताई पालवे पदर ,सौ लता गुठे, सौ सिंधुताई दहिफळे, डॉ भास्कर बडे, अनिल सानप स्वागत अध्यक्ष प्रशांत आंधळे यांच्या उपस्थितीत पार पडले . सन्माननीय अध्यक्ष यांच्या परवानगीने सत्कार सामारंभ व राज्यातील प्रतिभावंत साहित्यिक यांना पुरस्कार गौरविण्यात आले अनिल सानप व संदीप ढाकणे यांनी उत्कृष्ट सुत्र संचालन केले . आरंभी प्रस्तावना प्रशांत आंधळे या यांनी केली .के के सानप उद्योग रत्न सिंधुताई दहिफळे सौ लता गुठे बुधाजी पानसरे डॉक्टर लक्षराज सानप गणेश खाडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केले. सौ कांचताई खाडे यांनी मुंडे साहेब यांच्या आठवणींना उजाळा दिला.ह भ प तुळशीराम महाराज गुट्टे यांनी साहित्य निर्मिती मध्ये संतांचे अनमोल योगदान आणि संतामुळे दर्जेदार साहित्य निर्माण झाले