
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी अहमदपूर – विष्णू पोले
अहमदपूर :- धसवाडी ता.अहमदपूर जि. लातूर येथील राठोड रमेश पंडित यांना डी. एस. लोखंडे पाटील मुख्य संपादक यांच्या हस्ते उत्कर्ष पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुखेड येथील जिजाऊ इंग्लिश स्कूल मध्ये स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी लातूर, नांदेड, परभणी, औरंगाबाद येथील पत्रकार उपस्थित होते
दै.चालू वार्ता वर्तमान पत्राचा वार्षिक स्नेह मेळाव्यामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रतिनिधीचा सन्मान सोहळा मुखेड येथील जिजाऊ इंग्लिश स्कुल येथे आयोजित करण्यात आला होता.तेंव्हा अहमद्पुर प्रतिनिधी राठोड रमेश, श्री.बाजीराव पाटील कळकेकर कंधार तालुका प्रतिनिधी,माधव गोटमवाड, श्री . कराळे सर परभणी उपसंपादक, श्री.गोविंद पवार सर नांदेड जिल्हा उपसंपादक, देगलूर प्रतिनीधी संतोष मनधरणे ईत्यादी प्रतिनिधीचा सन्मान चिन्ह व गोल्ड मेडल देऊन दै.चालू वार्ताचे मुख्य संपादक श्री.डी. एस.लोखंडे पाटील साहेब यांच्या हस्ते सर्व जिल्ह्याचे उपसंपादक , पत्रकार यांच्या गौरव करण्यात आला.
सर्व जिल्हा व तालुका प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते.संपादक आणी इतर मान्यवर मंडळीने मार्गदर्शन केले आपल्या वर्तमान पत्राला योग्य दिशा देण्यासाठी सूचना केल्या.या कार्यक्रमाचे आयोजन श्री.डि.एस.लोखंडे पाटील मुख्य संपादक श्री.सुरेश जमदाडे सर मुखेड तालुका प्रतिनिधी, श्री .बाजीराव पाटील कळकेकर कंधार तालुका प्रतिनिधी, श्री.संतोष मनधरणे सर देगलूर तालुका प्रतिनिधी,श्री.शिवकुमार बिरादार सर मुखेड ग्रामीण प्रतिनिधी या सर्वानी केले होते.