
दैनिक चालू वार्ता अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी- बालाजी देशमुख
अंबाजोगाई… वैद्यकीय शिक्षणासाठी आर्थिक संकटात सापडलेल्या निकिता सर्जेराव राऊत पाटील राहणार कवडगाव तालुका माजलगाव या मुलीला येथील गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने देऊ केलेल्या पन्नास हजार रुपयाचा धनादेश काल तिच्याकडे सुपूर्द करण्यात आला अंबाजोगाई वैद्यकीय शिक्षणासाठी आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या निकिताचा यंदा वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंबर लागला मात्र केवळ तिच्याकडे फीस भरण्यासाठी पैसे नसल्याने तिचा प्रवेश अडचणीत आला होता कारण सेमी गव्हर्नमेंट कोट्यातून नंबर लागला सामाजिक जाणीव पत्रकार राम कुलकर्णी यांनी या प्रश्नावर विशेष लक्ष घातले अंबाजोगाई येथील सामाजिक कार्यकर्ते महेश काका लोमटे यांच्या नेतृत्वाखाली गुड मॉर्निंग ग्रुपच्या सर्व सदस्यांनी एकत्रित येऊन मदतीचा हात दिला विशेष म्हणजे वर्तमानपत्रातून सदर मुलीची कैफियत ऐकल्यानंतर अनेकांनी तिच्या शिक्षणासाठी मदत केल्याची प्रतिक्रिया पूजा कुलकर्णी यांनी दिली गावातील ग्रामस्थांनी या प्रश्नावर विशेष पुढाकार घेत गावची लेख म्हणून तिला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली काल महेश काका लोमटे सौरभ राम कुलकर्णी प्राध्यापक सावंत बिडगर आधीच्या उपस्थितीत 50 हजार रुपयांचा धनादेश निकिताकडे सपोर्ट करण्यात आला गोविंद केकान पुणे या तरुणांनी देखील तीस हजार रुपये आर्थिक मदत निकितासाठी पाठवली बाकी काही असलं तरी चांगले माणसं एकत्रित आल्यानंतर चांगल्या कामात सहकार्य कसं होतं याचा उदाहरण म्हणजे गुड मॉर्निंग ग्रुप चे सर्व सदस्य होय