
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा –
पुणे : मी पहिल्यांदा सन 1958 मध्ये कॉंग्रेस भवनमधे आलो होतो. आज अनेक वर्षांनी पुन्हा आलोय. त्याकाळी कॉंग्रेसमधे अनेक नेते कार्यरत होते. पुणे म्हणजे कॉंग्रेस आणि कॉंग्रेस म्हणजे पुणे असं त्यावेळी समीकरण होतं. स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेसचं केंद्र इथेच होतं. महाराष्ट्र प्रदेशचा कारभार या वास्तूतून चालायचा. इथून कॉंग्रेसच्या नेत्यांनी इंदिरा गांधीच्या माध्यमातून नेहरुंना कन्व्हेअन्स केलं आणि संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. यामध्ये पुण्यातील कॉंग्रेस भवनचं योगदान मोठं आहे, अशी आठवणही यावेळी शरद पवार यांनी सांगितली.