
दैनिक चालू वार्ता मोताळा प्रतिनिधी-गणेश वाघ:- तालुक्यातील ग्राम रोहिणखेड येथील अल्पावधीतच हजारो नागरिकांपर्यंत बँकिंग व्यवहार पोहोचवून आर्थिक क्रांतीची भाग्यरेषा ठरलेल्या राजर्षी शाहू मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मर्या. बुलढाणा र.न. ८१९ शाखा रोहिणखेड येथे आगामी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर दिनदर्शिका २०२३ चा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी रोहिणखेड गावातील व्यावसायिक प्रतिष्ठित, नागरिक विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच बँकेचे खातेदार यांची उपस्थिती होती. उपस्थित गावकऱ्यांमध्ये प्रसाद कृषी केंद्र संचालक जे.यु हिंगे, अमोल ऐंडोले, अमोल सुरळकर, ओम साई इंटरप्राईजेस राजू सुरपाटणे, चंद्रकांत पाखरे, विद्यानंद खारवे, उबाळखेड गावचे माजी सरपंच पवनकर, गावातील विविध क्षेत्रातील व्यावसायिक संजय सोनवणे, राहुल मस्कर, सागर गुजर, उमेश गजघाने, विपुल पंधाडे, पुरुषोत्तम आप्पा नवलाखे, पत्रकार सागर वानखेडे, राजश्री शाहू बँकेचे विभागीय व्यवस्थापक उबरहांडे, शाखा व्यवस्थापक निखिल शिंबरे,सहा, शाखा व्यवस्थापक अक्षय बिल्लोरे, संदीप गवई विमा प्रतिनिधी, सुनील राठोड लिपिक, सौ.पाखरे लिपिक, रोखपाल गरुडे, शुभम जटाळे सह कर्मचारी उपस्थिती होती. बँक व्यवस्थापन व सर्व कर्मचारी वर्ग यांनी सर्व खातेदारांना नवीन २०२३ वर्षाच्या राजर्षी शाहू परिवारातर्फे उपस्थितांना शुभेच्छा देण्यात आल्या. सर्वांना आगामी २०२३ नवीन वर्ष सुख समृद्धीचे जावो या शब्दात कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.