
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा-सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा तालुक्यातील केहाळ वडगाव येथील शेकऱ्याने सततची नापिकी, डोक्यावर कर्जाचा डोंगर, मुलाचे शिक्षण, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असह्य झाल्याने शेतकऱ्याने कंटाळून शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता. 29) दुपारी केहाळ वडगाव शिवारात गट नं(100)येथे घडली.नारायण विनायकराव दवणे (वय 35), रा. केहाळ वडगाव असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.त्यांच्या नावावर दीड एकर शेती आहे. शेतीत सतत तीन वर्षांपासून नापिकी होत होती. यावर्षी पाऊस जास्त पडला. त्यामुळे स्वायाबीन पीक गेले कपाशी, तुरीचे पीक बऱ्यापैकी होते. मात्र खते, फवारणीकरिता पैसे नसल्याने हातचे आलेले पीक जाण्याच्या स्थिती असल्याच्या चिंतेने शेतकरी नारायण विनायक दवणे यांनी गुरुवारी (ता. 29) दुपारी आपल्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. नारायण दवणे यांच्या शेतीवर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मंठा पंच्यानवं हजार रुपये कर्ज आहे. त्याच बरोबर पेरणीसाठी उसनवारीत घेतलेली रक्कम परत कशी करायची, कर्ज कसे फेडायचे या विचारात सापडलेल्या नारायण विनायकराव दवणे यांनी आत्महत्या केल्याची माहिती घरच्या नातेवाईकाने दिली.नारायण यांचा पश्च्यात पत्नी एक मुलगा व मुलगी आणि आई वडील असा परिवार आहे.