
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- पंडोरे शितल रमेश
————————————————–
नांदेड:- दि.२९ डिसेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ५ ते ६ सुमारास लोहा आणि माळेगाव मार्गावर ,माळेगाव यात्रा साठी जात असलेल्या दुचाकी वाहन चालक रमेश शेळके हे त्यांच्या दुचाकी वाहन गाडी नंबर एम एच १२ एम ५४८९ ही माळेगाव यात्रे साठी नांदेड वरून लोहा माळेगाव रस्त्यावरून यात्रे साठी जात असताना १ चारचाकी वाहनाने त्याच्या दुचकी वाहन ला उडवून तेथून वाहन चालक त्याची ४ चाकी वाहन घेऊन पळ काढला . त्यानंतर तेथील रस्त्यावर असलेल्या बाकीच्या वाहन चालकांनी आणि थेतील रहिवाशांनी रमेश शेळके यांना गंभीरपणे जखमी अवस्थेत यांना नांदेड च्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला. आता त्याच्यांवर उपचार चालू आहे.