
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक -मोहन आखाडे
_जीव जाताच आरोपीने केला मृतदेहाजवळ जल्लोष.._
औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पुन्हा ‘सैराट’ चित्रपटाची पुनरावृत्ती पाहायला मिळाली असून, 3 वर्षापूर्वी बहिणीला पळवून नेऊन लग्न करणाऱ्या तरुणावर भर रस्त्यात कुऱ्हाडीचे वार करून हत्या केल्याची घटना उघडीस आली असून जिल्ह्यात दोन दिवसांत दोन खून झाल्यामुळे औरंगाबाद जिल्हा हादरला आहे.. बापू खिल्लारे (वय 30 वर्षे) असे मृत युवकाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तीन वर्षांपूर्वी बहिणीला पळवून नेल्याचा राग मनात धरून भावाने औरंगाबाद पुणे महामार्गावरील दहेगाव बंगला जवळ इसारवाडी फाटा येथे बहिणीच्या पतीची भर रस्त्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करून ही निर्घृण हत्या केली आहे.
खून करून आरोपीने केला जल्लोष
संतापजनक म्हणजे कुऱ्हाडीने वार केल्यानंतर बहिणीच्या पतीचा जीव गेल्याची आरोपीने खात्री केली आणि त्यानंतर रस्त्यावरच जल्लोष केल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शी नागरिकांनी दिली आहे. सदरील घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली
काही तासातच आरोपी ‘ प्रिन्स ‘ ला ठोकल्या बेड्या
याप्रकरणी वाळूज पोलिसांनी अवघ्या दोनच तासात गतीने चक्र फिरवून आरोपीला नेवासा परिसरातून ताब्यात घेतले; त्याने गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड कोठे टाकली याचा शोध वाळूज पोलिस रात्री उशिरा पर्यंत घेत आहे अशी माहिती पोनि सचिन इंगोले यांनी दिली.