दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख खासदार शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. राज्यातील सध्याचे राजकीय वातावरण पाहता देवेंद्र फडणवीस यांनी आणि शरद पवार यांच्या गाडीतून प्रवास केल्याचे पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
डॉ. पतंगराव कदम यांच्या ७९ व्या जयंती निमित्त भारती सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्टुडंटस हौसिंग कॉम्प्लेक्सचा उदघाटन समारंभाचे अध्यक्ष म्हणून शरद पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. त्यावेळी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्टुडंटस हौसिंग कॉम्प्लेक्सचा उदघाटन कार्यक्रमाला जाण्यासाठी फडणवीस यांनी पवार यांच्या गाडीतून प्रवास केला. यावेळी पवार आणि फडणवीस यांच्या यांच्यासह भारती विद्यापीठाचे कार्यवाह माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम उपस्थित होते.
दरम्यान, आज (ता. ८) पहिला डॉ. पतंगराव कदम स्मृती पुरस्कार सीईओ सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांना मान्यवरांच्या हस्ते भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल, धनकवडी येथे देण्यात आला.


