दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि -माणिक सुर्यवंशी
“हात दाखवा लालपरी बस थांबवा ह्या ब्रिद वाक्याचे देगलूर आगार बस चालकांना पडतोय विसर”
—————————————————————— वझरगा, लख्खा ,वन्नाळी व खानापुर परीसरातील जेष्ठ नागरिक ज्यांचे वय वर्ष ७५ असलेल्या आशा नागरिकांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ लालपरी या बसने शासनाने मोफत प्रवास योजना सुरू केली आहे. परंतु वझरगा येथे बहुतांश लालपरी बसेस थांबत नसल्याने अनेक जेष्ठ नागरिकांना वझरगा येथेच अनेक तास ताटकळत बसावे लागत आहे.
——————————————————————
———————————-
देगलुर तालुक्याती वझरगा येथे लालपरी बसेस थांबवण्याचा दृष्टीने देगलूर आगारातील सर्व बस चालक यांच्या नावे तात्काळ सुचनेचे परिपत्रक काढुन प्रवाशांची होणारी गैरसोय तात्काळ थांबण्यात येईल . – अमर पाटील, आगार प्रमुख देगलूर .
——————————————————————
वझरगा: देगलुर तालुक्यातील वझरगा येथे देगलूर ते नांदेड जाणाऱ्या बहुतांश लालपरी बसेस हे थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असताना दिसुन येत आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील वझरगा वन्नाळी, खानापूर,येथे आदी ठिकाणचे प्रवाशी वझरगा येथून नांदेड जिल्हा कचेरी, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयात व तसेच परिसरातील बहुतांश विद्यार्थी हे देगलुर येथील मानव्य विकास विद्यालयात शिक्षण व इतर शाळेमध्ये घेण्यासाठी व तसेच परिसरातील हजारो नागरिक हे देगलुर येथील असलेल्या मोठ्या बाजारपेठेत खरेदीसाठी व विक्रीसाठी दररोज वझरगा येथून ये-जा करीत असतात. परंतु देगलूर आगरचे कांही लालपरी बसेस हे वझरगा थांबत नसल्याने विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी , सामाजिक कार्यकर्ते यांना बराच वेळ ताटकळत बसावे लागत आहे. त्या अनुषंगाने देगलूरचे आगार प्रमुख अमर पाटील यांनी संबंधित विषयाकडे लक्ष देऊन प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी अशी वझरगा परिसरातील प्रवाशांतुन मागणी होत आहे.


