
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
आज दि.12/01/2023 रोजी जि.प.प्राथमिक शाळा सिरपल्ली केंद्र-सिरंजनी पं.स. हिमायतनगर जि. नांदेड
शाळेत राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून सर्व विद्यार्थ्यांना घेऊन शालेय उपक्रमांतर्गत आज “वनभोजन व शिवारभेट” निमित्त सिरपल्ली येथील उपसरपंच श्री. बाबुराव पाटील जाधव यांच्या शेतात सर्व विद्यार्थ्यांना घेऊन जाऊन त्याठिकाणी गाणी,गप्पा गोष्टी, डान्स, कविता, बडबड गीते, पाढे, सर्व विद्यार्थ्यांनी गायन केले. या कार्यक्रमासाठी सिरंजनी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. धात्रक साहेब यांनी कार्यक्रमाला भेट दिली व सर्व विद्यार्थ्यांसोबत हितगुज, संवाद साधला. यानिमित्ताने सर्व उपस्थितांकडून केंद्रप्रमुख श्री. धात्रक साहेबांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. संतोष जाधव, उपाध्यक्ष श्री. राजु तपासकर, माजी अध्यक्ष श्री. प्रभाकर जाधव, प्रतिष्ठित नागरिक श्री. मिलिंद पाटील जाधव,शिक्षण प्रेमी सदस्य सुदर्शन पवार शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य व शा.पो.आ.स्वयंपाकी सोळंके बाई, गावातील नागरीक व युवा वर्ग, शाळेतील विद्यार्थी व मुख्याध्यापक श्री. गोणे एम.व्ही.व सहाशिक्षक श्री. जालने डी. एच. हे उपस्थित होते. स्वादिष्ट व रूचकर भोजन बनविण्यासाठी विशेष सहकार्य श्री. किशन उर्फ गोटू पवार यांचे लाभले. यात त्यांनी मिक्स फुलाव, ताकाची कढी /आमटी, भज्जे, जिलेबी उत्कृष्ट बनवली. सर्व विद्यार्थी व उपस्थितीतांनी भोजनाचा आस्वाद घेऊन तृप्त झाले. व एकंदरीत वनभोजन व शिवारभेटीमुळे सर्व विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत झाला..