
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा-सुरेश ज्ञा. दवणे..
जालना, मंठा..
सुवर्ण भूमीमध्ये बुद्ध अवतरले जागतिक बौद्ध धम्म गुरु भंते लहान फौजी यांनी उपस्थित बौद्ध बांधवांना धम्मा देसना देताना प्रतिपादन केले. परभणी ते चैत्यभूमी अशी ऐतिहासिक धर्म पदयात्रा ता २१ रोजी छत्रपती राजे संभाजी चौक मध्ये भगवान बुद्धाच्या च्या असती कलशाला वंदन करण्यासाठी तालुक्यातील हजारो बांधव सर्व समाज बांधवांनी हा ऐतिहासिक क्षण अनुभवला. यावेळी ए.जे बोराडे, जेके कुरेशी, अरुण वाघमारे, राजेश खंदारे, प्रकाश घुले, बाळासाहेब वांजोळकर, अजित नाना बोराडे, विकास सूर्यवंशी, उबेद बागवान, रमेश आवारे, विष्णू वाघमारे, ॲड अनिल मोरे, कुंदन मोरे,अशोक अवचार, नानाभाऊ वाघमारे, गंगाराम गवळी, शरद मोरे, यांची उपस्थिती होती पुढे बोलताना बदलताना जागतिक धम्म गुरु फुजी म्हणाले जगाला शांतता संदेश देण्याचा हेतू या धम्मपदयात्रेमधून असून ही भव्य धम्मपद यात्रा मानवतेच्या शांततेसाठी बुद्धाच्या मार्गाने नेण्याचा हेतू आहे भारत आणि थायलंड या दोन देशाचे संबंध या यात्रेमधून घनिष्ठ होतील मानवते मध्ये मैत्री भाव वाढावा, जगातील दुःख दूर करण्यासाठी बुद्धाचाच मार्ग जगाला तारेल.
—————
🎆भारतीयांना न्याय देण्यासाठी जगातील शक्तिशाली राज्यघटना ची सूत्रे समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय हे मूल्य जोपासून या मानवी मूल्याची प्रतिष्ठापना व्हावी हेतु मनी ठेवून हे धम्म पदयात्रा डॉ गगन जी मालिका यांच्या विचाराने.. आयोजक सिद्धार्थ हतीआंबिरे
—————— 🎆भगवान बुद्धाच्या पवित्र अस्थिकलशाला बघण्याचा जो क्षण प्राप्त झाला, अडीच हजार वर्षाचा धम्म ज्या महामानवाने या विश्वात पेरला त्या महामानवाला भेटण्याचा मोह आनंदाने भरून आला. नगरसेवक अरुण वाघमारे