
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
कोरपना तालूका
कोरपणा या तालुक्याच्या ठिकाणी आठ ते दहा हजार लोकसंख्या असून निजाम कालीन मालगुजारी तलाव या ठिकाणी अस्तित्वात आहे मात्र जनावरांना व नागरिकांना वापर करण्याला पाणी साठा होत नाही या ठिकाणी यापूर्वी रोजगार हमी योजना व जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत धातुर्मातुर खोलीकरणाचे काम करण्यात आले होते मात्र त्यामुळे गावाच्या नागरिकांची व भूगर्भातील पाणी पातळी वाढ झालेली नाही यामुळे नगरपंचायतीला उन्हाळ्यामध्ये टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची पाळी येत असते यामुळे लाखो रुपयाचा चुरडा केल्या जाते कोरपना या शहराला नळ योजना नसल्यामुळे तसेच एकही सार्वजनिक विहीर अस्तित्वात नसल्याने नागरिकांना स्वतंत्र याच्या७५ वर्षात कुप नलिका वरून पाण्याची व्यवस्था करावी लागते त्यामुळे कमालीचा महिलांना त्रास सहन करावा लागतो स्वतंत्र्याचे 75 वर्षे साजरे करत असताना राज्यातील एकमेव विहीर नसलेली व नळ योजना नसलेली ही नगरपंचायत आहे मात्र या ठिकाणी पूर्वकाळातील एक तलाव असून तो सरकारी मामा तलाव म्हणून सर्वे नंबर 49 4 हेक्टर 12 जमीन क्षेत्र आहे या जमिनीचे भूमापन सीमांकन करून या गावातील पाणी समस्या मात करण्यासाठी नुकतंच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३बी राजुरा आदिलाबाद याचे काम सुरू झाले असून कोरपणा येथील तलावाच्या भूगर्भात उत्कृष्ट मुरूम माती असल्यामुळे त्याचा वापर रस्ते विकास कामावर करण्यात यावा यामुळे तलावाचे खोलीकरण गावातील पाणी समस्या व लगतच्या शेतकऱ्यांना सिंचनातून उत्पादनात वाढ होणार आहे याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे आबिद अली यांनी जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग गडचिरोली यांच्याकडे निवेदनाद्वारे तलावाच्या खोलीकरणाची मागणी केली आहे नुकतेच हे तलाव सिंचन विभागाने जिल्हा परिषद कडून नगरपंचायतीला हस्तांतर केल्याचे करते मात्र याबाबत ताबा प्रक्रिया व भूमापन सीमांकन झाले नसल्यामुळे सर्वे नंबर 49 च्या सरकारी तलाव अशी नोंद असलेल्या भूमापन मोजणी करून खोलीकरणाची मोहीम राबवावी अशी मागणी केली आहे