
दैनिक चालु वार्ता उस्माननगर (प्रतिनिधी )-लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर:- भारतीय ७३ वा. प्रजासत्ताक दिन येथील जवाहरलाल नेहरू विद्यार्थी वस्तीगृहात उस्माननगर पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग डी.भारती यांच्या हस्ते ध्वजारोहण करून उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्व प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.त्यानंतर तिरंगी ध्वजाचे ध्वजारोहण उस्माननगर पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग डी.भारती यांच्या हस्ते करण्यात आला .यावेळी सेवासहकारी सोसायटीचे चेअरमन तुकाराम वारकड गुरूजी,सरपंच प्रतिनिधी व्यंकटराव पाटील घोरबांड,भारतीय सैनिक योगेश कांबळे,पोलीस पाटील विश्वंभर मोरे,पोलीस कर्मचारी अनिरूद्ध वाडे,देवराव सोनसळे, अशोक काळम, अमिनशहा फकीर, माजी सरपंच अमिन अदमनकर,वैजनाथ पाटील घोरबांड, बाबूराव पाटील घोरबांड, ग्रा.पं.सदस्य संजय वारकड, कमलाकर शिंदे,शिवशंकर काळे,सदस्य प्रतिनिधी बालाजी पाटील घोरबांड , तलाठी सौ.कदम ग्रामसेवक सौ.डी.शिंदे,माजी जि.प.सदस्य माधव भिसे,चांदोबा
पेनुरकर नरेश शिंदे, पत्रकार प्रदिप देशमुख ,माणिक भिसे,अमजत पठाण, वसतिगृहातील विद्यार्थी,कर्मचारी व गावातील नागरीक उपस्थित होते.वसतिगृहातील कर्मचारी लक्ष्मण कांबळे यांनी शब्द सुमनाने स्वागत केले व आभार मानले.