
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -विष्णु मोहन पोले.
अहमद्पुर:तालुक्यातील येस्तार येथे असलेल्या सानेगुरुजी विद्यालय येथे कार्यरत असणारा मास्तर म्हणजे दयानंद बिरादार.आज मी सहज व्हॉट्सप ग्रुप गुरु शिष्य संवाद उघडला आणी अनेक भावनिक पोस्ट बघितल्या त्या मध्ये बिरादार सर यांच्या वाढदिवसानिमित्त भावनिक शुभेच्छा होत्या.गुरु हा शब्द आपण पौराणिक काळात एकला असेल पण गुरु शिष्य भक्ती बघायची असेल तर मन्याड खोऱ्यात वसलेल्या साने गुरुजी विधायलायला भेट द्यावी लागेल.येथे शिक्षक,वकील,इंजिनियर,डॉक्टर,पत्रकार,प्रतिष्टीत शेतकरी इतर क्षेत्रात कार्यरत असणारी मंडळी शेकड्यानी सापडतील पण शिक्षकी पेशात बहुजनाचा उधार करणारा एकमेव मास्तर हाच तो.नियतींनी घात केला म्हणून हजारो विध्यर्थ्यांच्या विकासात बाधा न कारता माझे विधायरथी हेच माझं जीवन हे ब्रीद वाक्य समोर ठेऊन त्यांनी मन्याड खोऱ्यातील विध्यर्थ्यांसाठी जे केलंय ते खूप अमूल्य आहे.सुमठाणा,येस्तार,टाकळगाव, वंजारवाडी,शेणकूड, पार, मावलगाव,चिलखा या गावा मध्ये बिरादार मास्तर येतायत हे ऐकल्या नंतर विठ्ठलाची भेट होते हा उत्साह शिक्षा प्रेमी मध्ये असतो.हाच या गुरुजींचा मोठे पणा आहे.त्यांना ज्यांची साथ लाभली ते म्हणजे वाडीकर मॅडम,मठपती सर,बनसोडे सर म्हणजे जीवनात कस जगाव आणी आणी का जगाव हा सांगणारा अवलिया.तुमराम सर,आणी इतर शिक्षकांचा समूह घेऊन मान्याड खोऱ्यातील विध्यार्थ्यांना ज्ञान रुपी अमृत पाजविणाऱ्या महान मानवास वाढदिवसाच्या त्यांच्या सर्व विध्यर्थ्यां तर्फे शुभेच्छा