दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी-शिवकुमार बिरादार
मुखेड: शहरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या करियर कट्टा समन्वयक प्रा.डॉ. संतोष शेंबाळे यांची उत्कृष्ट जिल्हा समन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे . महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ” करियर कट्टा ” या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील चांगली कामगिरी करणाऱ्यांचा नुकतेच मुंबई येथे गौरव करण्यात आला आहे .
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिणे , प्राध्यापक सी.बी.साखरे , करियर कट्टा समन्वयक प्रा.डॉ. शिवसर्जन टाले , अधिक्षक एस.के.सुर्यवंशी आणि सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन करून सत्कार करण्यात आला .
