
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
ता.०८ (पुणे प्रतिनिधी)
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडीतील उपक्रमशील शिक्षक सचिन शिवाजीराव बेंडभर पाटील यांच्या मामाच्या मळ्यात या नुकत्याच प्रकाशित झालेल्या बालकाव्यसंग्रहाचे प्रकाशन महिला दिनानिमित्त शाळेतील महिला शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर युवा साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत कवितेचा प्रवास उलगडला. कविता कशी तयार होते? त्याची पार्श्वभूमी सांगत रोजच्या जगण्याच्या लढाईला कविता कशी बळ देते हे समजावून सांगितले. त्यावेळी त्यांनी मामाच्या मळ्यात या त्यांच्या प्रकाशित शिर्षक कवितेचे सादरीकरण केले. तसेच महिला दिनानिमित्त त्यांनी विद्यार्थ्यांसाठी आई म्हणते ही थोर महिलांच्या जीवनावरील आधारित कविता सादर करत महिलांचे आपल्या जीवनातील महत्व विशद केले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पवार, उपमुख्याध्यापिका शरिफा तांबोळी, शिष्यवृत्ती तज्ञ एकनाथ खैरे, सुनिल पलांडे, जयश्री पलांडे, किरण अरगडे, संदीप गीते, गोरख काळे, प्रतिभा पुंडे, विद्या सपकाळ, तंत्रस्नेही शिक्षक दीपक खैरे, संगीत शिक्षक तुषार सिनलकर, क्रीडा शिक्षक पोपट दरंदले, आणि साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर उपस्थित होते.
तर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप वाबळे, उपाध्यक्ष मल्हारी वाबळे, शाळा व्यवस्थापन समितीच्या माजी अध्यक्षा सुरेखा वाबळे, माजी उपाध्यक्ष सतीश कोठावळे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाबळे, माजी उपसरपंच भगवान वाबळे, ज्येष्ठ नागरिक केशव वाबळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष अंकुश वाबळे, प्रकाश विठ्ठल वाबळे आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपट दरंदले, स्वागत तुषार सिनलकर तर आभार एकनाथ खैरे यांनी मानले.
वाबळेवाडी शाळेच्या या उपक्रमाबद्दल केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर, विस्तार अधिकारी वंदना शिंदे, गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर यांनी अभिनंदन केले आहे.