दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी-बालाजी देशमुख
अंबाजोगाई तालुक्यातील उजनी येथे अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या पथकाने पत्याच्या क्लबवर धाड टाकत आठ जुगारी जुगार खेळताना रंगेहात पकडत 1 लाख 54 हजार 60 रुपये चा मु्देमाल जप्त करण्यात आला.
गुरुवार दिनांक 9 मार्च रोजी अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर यांना गुप्त बातमी दारा मार्फत बातमी मिळाली कि उजनी पाटी ते उजनी या रोड वरती रोड च्या बाजूला पश्चिम दिशेला मोकळ्या जागेत लिंबाच्या झाडाखाली काही इसम स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना व बेकायदेशीर रित्या तिरट नावाचा जुगार खेळत आहेत. अशी बातमी मिळाल्या बरोबर अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी सपो निरीक्षक रवीदं शिंदे व टीम ला सादर बातमी च्या ठिकाणी जाऊन खात्री करण्यासाठी सांगितले, त्यावरून त्याच्या टीम ने तेथे जाऊन खात्री केली आसता उजनी पाटी ते उजनी गावात जाणाऱ्या रोडच्या पश्चिमकडील बाजूस लिंबाच्या झाडाखाली मोकळ्या जागेत गणपत नामदेव गुट्टे, बापूसाहेब गोविंदराव गायकवाड,राम रंगनाथ मुंडे,राजकुमार उत्तम जाधव,संजय बळीराम राऊत, माणिक तुकाराम मुरकुटे, माणिक काशीराम मुंडे, विनायक माणिक फड हे आठ इसम गोलाकार बसून तिरट नावाचा जुगार खेळतांना तेथे मिळून आले.जुगार खेळणाऱ्या 8 जणाना ताब्यात घेत त्यांच्याकडून 1 लाख 54 हजार 60 रुपये चा मु्देमाल जप्त करण्यात आला.
सदर ची कारवाई सपोनि शिंदे, पोह अनिल दौंड, पोह तानाजी तागड, पोना देवानंद देवकते, पो अ राऊत बांगर यांनी केली. सदरील 8 जुगार खेळणाऱ्या इसमा विरुद्ध पोलीस स्टेशन बर्दापूर येथे तानाजी तागड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
