दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी -श्रीकांत नाथे
अमरावती : आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय व स्मृती सेवाश्रम नया अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ९ फेब्रुवारी रोजी पूर्व जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिर घेण्यात आले होते.या शिबिरामध्ये रोहनखेड,टाकळी,चंडिकापूर,वलगाव,टाकरखेडा,नांदुरा,अचलपूर,सालोरा,कुष्टा बु.,तिवसा,सावळापूर येथून आलेल्या ३२ रुग्णांना मोतीबिंदू,हृदयविकार,हर्निया,गाठीचे आजार तसेच विविध आजार पीडितांना नामांकित वर्धा येथील सावंगी मेघे हॉस्पिटल मध्ये शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर काळे,विवेक जवंजाळ,अक्षय साबळे,राजू ठाकरे,दिवाकरराव सगने,रुपेश ढोके,राहुल ढोके आदी मंडळी उपस्थित होती.
