
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भूम:- तालुक्यातील माणकेश्वर येथे स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेवून स्वखर्चातून तहानलेल्या साठी पाणपोईची सोय केली आहे.एप्रिल महिन्यातच उन्हाचा पारा चढला आहे .उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता पाणपोई ची सुरवात केली. तालुक्यात माणकेश्वर स्वराज्य संघटनेचे काम आदर्श ठरत आहे. यावेळी उद्घाटन ॲड.विलास पवार (राज्य कार्यकारिणी सदस्य ) प्रशांत किरमे(शाखा अध्यक्ष) ,गणेश अंधारे महाराज सामाजिक सेवक, राहुल कळसुले, सुजित शिंदे,रणजित वाळजे,अशोक देवकते, शरद पाटील,अशोक देवकते, शंकर अंधारे, अमोल बनगर, संकेत अंधारे,नितीन गिलबिले, वैभव गायकवाड, शरद उमाप,भाऊसाहेब काळे, अंकुश अंधारे उपस्थित होते तसेच निलेश विर सर, गणेश नलवडे , ॲड अरविंद हिवरे , अर्जुन जाधव,ग्रामस्थ उपस्थित होते.