
दैनिक चालु वार्ता नांदेड – प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव .
8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शाळेतील सर्व शिक्षिका, बालवाडी ताई, सेविका यांचा गौरव करण्यात आला तसेच शाळेतील शिक्षिका अपर्णा लाडेकर यांना नाशिक येथील निर्माण फाउंडेशन तर्फे सावित्रीबाई ज्योती राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्यामुळे ही शाळेसाठी बहुमानाची बाब असुन त्यांच्या राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्ती मुळे जागतिक महिला दिनानिमित्यानें सहशिक्षीका अपर्णा लाडेकर यांचा शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय दिलीप वाडेवाले सर यांनी व सर्व कर्मचाऱ्यांनी गौरव करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. .या कार्यक्रमास मुख्याध्यापक दिलीप वाडेवाले सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख शहाजी आहेर सर,पर्यवेक्षक पंढरीनाथ काळे , वजिराबाद विभागाच्या पर्यवेक्षिका गिरे मॅडम,कोणाळे सर , गजानन शेळगावे सर,नाईक सर, अपर्णा लाडेकर मॅडम,तेलंग मॅडम, संगीता वाखरडे मॅडम, स्वामी मॅडम,कांताबाई नांगरे मॅडम, ज्योती नांगरे इत्यादी सह मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व विद्यार्थिनीची संख्या उपस्थित होती.