दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनीधी -समीर मुल्ला
पारधी समाजातील लोकांना उद्योग, व्यवसाय व्यापारच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धाराशिव (उस्मानाबाद)पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी कळंब उपविभागीय पोलिस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी शुक्रवार( दि. 10) कळंब पोलिस ठाण्यात पारधी समाजातील लोकांना एकत्र करून मार्गदर्शन केले. आता आम्ही उद्योग व्यवसायाकडे वळण्याचा प्रयत्न करू असा पारधी समाजातील लोकांनी आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात विश्वास व्यक्त केला. तालुक्यातील पानगाव येथे शासकीय जागेवरील अतिक्रमण काढण्यावरून दोन समाजात मोठा वाद होऊन राडा झाला होता. याप्रकरणी दोन समाजातील अनेक नागरिकाविरुद्ध पोलीस सात गुन्हा दाखल झाला पारधी समाजाबाबत काही समाजातील लोकांत गैरसमज आहेत. त्यामुळे त्यांनी स्वच्छतेची वागणूक मिळते या समाजातील लोक जीवन कसे जगत असतील त्यांना भविष्य काय त्यांच्या मुलाबाळांचे पुढे काय ? चालू काय होणार? असे चिंतेचे प्रश्न कळंब पोलिस उपविभागीय अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्यासमोर उभे टाकले
समाज सुधारण्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत शासनाच्या विविध या समाजातील लोकापर्यंत पोहोचतात काय याचे निरीक्षण करून करण्यात आले त्यातून चिंतेचे काम समोर आल्याने कळंब उपविभागीय अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी ही बाब धाराशिव (उस्मानाबाद) पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या निदर्शनास आणून दिली त्यानंतर तेरखेडा,पारगाव आदी पारधी समाज बहुल असलेल्या भागात भेट देऊन या समाजातील परिवर्तन करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला
कळंब पोलीस ठाणे हद्दीतील पारधी समाजातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मार्गदर्शन करून केंद्र व राज्य शासन राबवीत असलेले दिन दयाल उपाध्याय योजने अंतर्गत सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणीसाठी योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच
शासनाचे घरकुल रोजगार उद्योग लघुउद्योग संदर्भात वेगवेगळे योजना बाबत माहिती देण्यात आली व पारधी समाजातील बेरोजगार तरुण तरुणीची नावे घेऊन त्यांना प्रशिक्षण देण्याबाबत आश्वासित करण्यात आले पोलीस अधीक्षक श्री कुलकर्णी यांच्या संकल्पनेमुळे पारधी समाजामधील सुशिक्षित बेरोजगार तरुण यांना नोकरी व स्वयंरोजगार संधी उपलब्ध होणार आहे
या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ता मनीषा वाघमारे यांनी यापूर्वी प्रशिक्षण घेतलेले पारधी समाजातील रोजगारांची संधी उपलब्ध करून दिलेले दोन मुलांनी त्यांच्या मनोगत व अनुभव व्यक्त केले सदर वेळी मनीषा वाघमारे यांनी महिलांना बचत गट स्थापन करून बचत गटांना मिळणाऱ्या लाभाविषयी व लघु उद्योगा विषयी मार्गदर्शन करण्यात आले यावेळी कळम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड जिल्हा विशेष पोलीस शाखा पोलीस निरीक्षक दासुरकर ,सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल पाटील, कल्याण नेहरकर, पोलीस उपनिरीक्षक रामहरी चाटे, अमोल मालसुरे ,महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षा साबळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दत्तात्रय वाघे, उपस्थित होते पारधी समाजातील शंभर ते दीडशे महिला पुरुष उपस्थित होते
