दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनिधी -समीर मुल्ला
04.फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 03.00 ते 06.15 वाजण्याचे दरम्यान संदीप लहु मोराळे रा.वडजी हे घराला कुलूप लावून शेतामध्ये कामानिमित्त गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी कोंडा काडून घरात प्रवेश करुन घरातील कपाटाचे लॉक तोडून कपाटामध्ये ठेवलेले रोख रक्कम 5000 रूपये व सोने चांदीचे दागिने असा एकुण 65,000 रूपये किंमतीचा माल चोरुन नेला होता. यावरुन पोलीस ठाणे येरमाळा येथे गुन्हा गु. रजि. नं. 43/2023 कलम 454, 380 भा.द. सं. प्रमाणे दाखल आहे.
धाराशिव (उस्मानाबाद) मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक. नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली व कळंब उपविभागीय अधिकारी सहायक पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या सुचनांप्रमाणे येरमाळा पोलिस ठाण्याचे सपोनि. दिनकर गोरे, यांनी एक पथक तयार करुन पोहेकॉ कपील बोरकर यांना मिळालेल्या माहितीवरुन सदर गून्ह्याच्या घटनास्थळांचे शेजारी राहणारी महिला नामे मनकर्णा नारायण मोराळे हिस दि. 12.03.2023 ताब्यात घेवून तिच्या कडे विचारपुस करुन तिच्या घराची घरझडती घेतली असता घरझडतीमध्ये सदर गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल एक चांदीचा करदोडा, लहानमुलाची पिळ्याची सुवर्ण अंगठी, दोन लहान मुलाचे सुवर्ण बदाम, कानातील सुवर्ण झुबंर व लटकन, एक 64 मण्याचे दोन मंगळसुत्र असलेले सुवर्ण पोत, एक वाळा, एक सुवर्ण अंगठी असा सर्व मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करुन सदर महिलेला रोजी अटक करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदर कार्यवाही ही येरमाळा पोलिस ठाण्याचे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर गोरे, पोलीस उप निरीक्षक आनंदराव वाठोरे, , पोलीस नाईक कपील बोरकर, विशाल गायकवाड, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल तस्लीम चोपदार, पोलीस नाईक शाहरुख पठाण, चालक निसार शेख यांचे पथकाने केली आहे.
