दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य मध्यमवर्ग जनता खरोखरच्या विकासाने आज प्रभावित झालीय…
२०१४ मध्ये तेलंगण राज्याची निर्मिती झाली. अवघ्या ७ ते ८ वर्षात तेलंगणाच्या मुख्यमंत्री के.सी.आर यांनी शेतकरी, कष्टकरी, मध्यमवर्गीय लोकांसाठी विशेष योजना राबवून तेलंगणा राज्याचा विकास घडवून आणला.
तेलंगणात होतंय मग महाराष्ट्रात का नाही
के.सी.आर यांनी आधी केले, मग सांगितले
१. शेतकऱ्यांना 24 तास मोफत वीज.
२. पेरणीसाठी आगोदर 10,000 रु. एकरी मदत.
३. नदी जोड प्रकल्पामुळे 100% क्षेत्र सिंचनाखाली आणले.
४. शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास (अपघाती असो किंवा नैसर्गिक) कुटंबीयांना 5,00,000/- रु. ची तात्काळ मदत. (आतापर्यंत 1 लाखांपेक्षा जास्त कुटुंबीयांना वितरीत.)
५. सरकार स्वतः धान खरेदी करते.
६. दुःखद व आकस्मिक प्रसंगासाठी 100% प्रिमिअम देणारी विमा योजना सरकार स्वतः राबविते.
७. शेतकरी मंच योजनेद्वारे 5000 एकर चा एक समूह करून त्यासाठी एक स्वतंत्र कृषी अधिकारी काम करतो.
८. कल्याण लक्ष्मी व शादी मुबारक योजने अंतर्गत मुलींच्या लग्नासाठी 1,00,100/- रु. विना अट तात्काळ मदत.
९. ज्येष्ठ नागरिकांना व एकट्या स्त्रियांना दर महिन्याला 2016 रू. पेन्शन.
१०. दिव्यांगासाठी दर महिन्याला 3016 रू. पेन्शन.
११. गरीब व गरजू लोकांना 100% अनुदानावर 2 बेडरूम किचन घरे दिली जातात. (3 लाखाहून अधिक लोकांना लाभ)
१२. दलीत व आदिवासी उद्योग करणाऱ्यांसाठी प्रोत्साहन योजना (आतापर्यंत 47,080 उद्योजकांसाठी 2,139 कोटी वितरीत)
१३. दलितांसाठी प्रत्येक कुटुंबासाठी विना परतफेड 10 लाख रु. एकरकमी दिले जातात. (वर्ष 2021-22 मध्ये 29,700 लाभार्थी तर वर्ष 2022 -23 मध्ये 1,75,000 लाभार्थी)
१४. धनगर बांधवांसाठी पाळण्यासाठी मोफत मेंढ्या वाटप केल्या जातात.
१५. मिशन भगीरथ अंतर्गत शेतीला सिंचनासाठी मुबलक पाणी तर पिण्यासाठी प्रत्येक घरात नळ, स्वच्छ व मुबलक पाणी.
१६. गरोदर व स्तनदा मातांसाठी मोफत ने – आन व सर्व आरोग्य सुविधा. बाळाच्या जन्मानंतर 12,000 रू. तर मुलीच्या जन्मानंतर 13,000 रू. संगोपनासाठी दिले जातात.
१७. कंटी वेलमु जगातील सर्वात मोठे नेत्ररोग शिबिर राबविले.
१८. आपले गाव आपली शाळा शिक्षण योजना राबवून शिक्षणावर भर.
त्यामुळे तेलंगणा एक समृद्ध राज्य झाले आहे. शेतकरी समृद्ध झाल्याने एकही आत्महत्या होत नाही.
महाराष्ट्र राज्य तर नैसर्गिकरीत्या समृद्ध आहे. वरील सर्व गोष्टी महाराष्ट्रात करणे सहज शक्य आहे. पण जनतेला देण्यापेक्षा नेत्यांनी फक्त स्वतःच्याच तुंबड्या भरल्या.
खरोखरच्या विकास कार्यामुळे प्रभावित होऊन आज अनेक शेतकरी, कष्टकरी, आदिवासी, दलीत, मध्यमवर्गीय जनता भारत राष्ट्र समिती (BRS) सोबत जोडले जात आहे .
या विषयाकडे महाराष्ट्र सरकार व सामाजिक कार्यकर्ते लोकप्रतिनिधींनी खरंच विचार करून आपल्या महाराष्ट्र हा समृद्ध व विकसित कसा करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे तरच आपला महाराष्ट्र हा भारतातील सर्वात प्रगतशील राज्य बनू शकेल.
