दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -अवधूत शेंद्रे
आष्टी(श) प्रतिनिधी: तालुक्यातील पंचाळा (पोरगव्हान) येथील काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते श्रीरामजी नेहारे (७५) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले ते गट ग्रा.पं.
पोरगव्हाण येथील सरपंच तद्वतच माणिकवाडा पं.स.क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे पहिले पं.स.सदस्य म्हणून निवडून आले होते.स्व.श्रीरामजी नेहारे यांचे व्यक्तिमत्व सामाजिक ,राजकीय क्षेत्रात प्रेरणादायी व मार्गदर्शक दर्ज्याचे होते ते गोवारी समाजातील निर्णयक्षम नेतृत्व म्हणून सर्वदूर परिचित होते समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विविध कार्याच्या रूपाने पोहोचणारे एकमेव नेते म्हणून परिचित होते विरोधी पक्षातही त्यांचे अगदी जिवाभावाचे मित्र होते त्यामुळे राजकारणात स्व.श्रीरामजी नेहारे एक अजातशत्रू ठरलेत त्यांच्या जाण्याने सामाजिक राजकीय क्षेत्रात न भरून निघणारी एक पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या जाण्याचे दुःख शब्दा पलीकडे असल्याच्या शोक संवेदना यावेळी काँग्रेस पक्षाचे माजी आ.अमर काळे, माजी सरपंच प्रशांत काकपुरे(साहूर)आंबेडकरी विचारवंत कृष्णाभाऊ हरले(साहूर) रवींद्र आप्पा गंजीवाले (आष्टी) यांनी व्यक्त केल्या स्व.श्रीरामजी नेहारे यांच्या पश्चात पत्नी,विवाहित ३ मुले,२ विवाहीत मुली आहेत त्यांचेवर स्थानिक मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात समाज बांधवांसह पंचक्रोशीतील चाहत्यांची उपस्थिती होती
