दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे.
देगलूर:मेडिकल व आय आय टी क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठा महाब्रँड बन्सल क्लासेसची सुरुवात देगलूर शहरात होत असून त्याअनुषंगाने दिनांक ०२ एप्रिल रोजी शिक्षक व पालक स्नेहमिलन सोहळ्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, राष्ट्रविख्यात बन्सल क्लासेसची देगलूरसारख्या ठिकाणी सुरुवात होत असल्यामुळे पालक व शिक्षकांनी बन्सल क्लासेसचे संचालक धीरज तोष्णीवाल यांचे आभार मानले.
बन्सल क्लासेसचे कोटा राजस्थान येथील प्रा. योगेश शर्मा, प्रा. यश मेवारा व प्रा. अमित पाठक यांनी नीट व आयआयटीविषयी सखोल मार्गदर्शन केले. पालक व शिक्षक यांच्या प्रश्न उत्तराच्या – सत्रात बन्सल क्लासेस नांदेडचे एस. आर. शिंदे पाटील यांनी सविस्तर करिअर, बन्सल पॅटर्नबद्दल समाधानकारक उत्तरे दिल्यामुळे अनेक पालक व शिक्षक, विद्यार्थी यांनी आभार व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. यासोहळ्यास ज्ञान सरस्वती इंग्लिश स्कूलचे सचिव माणिक जोशी, बन्सल क्लासेस शाखा देगलूरचे संचालक डॉ. विनय जोशी, प्राचार्य काळे, हर्षवर्धन लव्हाळे व सेवानिवृत्त मुख्याध्यापक दशरथ सुकणे यांनीही मार्गदर्शन केले. आपल्या पाल्यांच्या करिअरविषयी डॉ. विनायक मुंडे, अॅड. वीरेंद्र पाटील, प्रकाश बान्नाटे, नागनाथ सुकणे, कंतुलवार, वाघमारे, गणेश महाजन करडखेडकर, ग्रामसेवक संघटनेचे देगलूरतालुका अध्यक्ष सुरेश चप्पलवार, ग्रामसेवक राजेश तोटावार, सुदर्शन सरसर, शेख शब्बीर, श्याम वद्देवार. मिलिंद हावरगेकर, गोपाळ दोतुंलवार, सतीश, खारके, प्राचार्य हळदे, साळवे यांचासह परिसरातील अनेक व्यापारी, लोकप्रतिनिधी व प्रतिष्ठित पालक व महिलांचाही समावेश होता. या सोहळ्याची संकल्पना गोपाल तापडिया यांची होती. आभार प्राचार्य जयराम पागेकर यांनी मानले.
